पर्यावरणपूरक शाश्वत भविष्यासाठी लाॅयड्स मेटल्स नी उचलले पाऊल…

0
219

पर्यावरणपूरक शाश्वत भविष्यासाठी लाॅयड्स मेटल्स नी उचलले पाऊल…

घुग्घुसला औद्योगिक विकासात आणण्यासाठी लाॅयड्स मेटल्स सतत कार्यरत आहे.मात्र हा विकास शाश्वत आणि पर्यावरण पुरक असला पाहिजे.हा लाॅयड्सच्या द्दढ संकल्प आहे.कंपनीच्या कार्य क्षेत्रा मध्ये तसेच सभोवताली असलेल्या वनराईच्या देखभालीला प्राधान्य देऊन एक उल्लेखनीय उदाहरण सर्वांपुढे ठेवले आहे.

लाॅयड्स मेटल्सने हाती घेतलेल्या सर्वात उल्लेखनीय उपक्रमां पैकी एक म्हणजे घुग्गुस मध्ये कार्य सुरु झाल्यापासून आजवर केलेली अडीच लाखाहून अधिक वृक्षांची व्यापक लागवड.या एकत्रित प्रयत्नामुळे या प्रदेशातील हिरवळ तर वाढलीच पण पर्यावरणाच्या समतोल राखण्यातही मोलाची मदत झाली.एवढ्या मोठ्या संख्येंने वृक्षाची लागवड केल्याने आणि अक्षय उर्जेवर लक्ष केंद्रित केल्याने कार्बन उत्सर्जन कमी झाले.हवेची गुणवंता सुधारली आणि विविध वनस्पती आणि प्राण्यांसाठी निवासस्थाने उपलब्ध झाली.

लाॅयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या माध्यमातून परिसरात १५ हून अधिक सौर पथदिवे बसविले गेले आहेत.जवळपासच्या शाळांमध्ये ५ kv सौर विद्युत निर्मिती यंत्रणा बसवुन देण्यात आल्या आहेत.या सारख्या अनेक उपक्रमाद्वारे पर्यावरणपूरक विकास करण्याच्या कार्यात लाॅयड्स मेटल नेहम चा पुढाकार घेतो.धूळ साफ करण्यासाठी ट्रकमाउंटेड रोड स्वीपिंग मशीन आणि ‘फाॅमर मशीन’ कारखान्याच्या आवारात उपलब्ध करून देण्यात आले
आहे.फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण मोहिमेसह पर्यावरण संवर्धना बाबत जनजागृती सत्रांचेही आयोजन वेळोवेळी करण्यात येते.

लाॅयड्सने इलेक्ट्रिक कारचा वापर करण्यात देखील सुरुवात केली आहे.एवढेच नव्हे,तर ही वाहने चार्ज करण्यासाठी सौर उर्जेचा वापर करण्यासाठी सौर उर्जेच्या वापर करण्याची देखील योजना आहे.नजीकच्या भविष्यात कंपनी ‘झिरो लिक्विड डिस्चार्ज’सुविधा उभारण्यासाठी आणि कायमच्या परिसरात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली निर्माण करण्यासाठी तयारीत आहे.
कंपनीने ‘ग्रीन लाॅजिस्टिक्स’च्या क्षेत्रातही लक्षणीय प्रगती केली आहे.लाॅयड्स मेटल्सने महाराष्ट्रातील सर्वात लांब स्लरी पाईपलाईनची निर्मिती केली आहे.तब्बल २०० कि
मी.पसरलेल्या या पाईपला इनचा वापर सुरजागड खाणी पासुन घुग्घुस प्लाटपर्यंत कच्चा मालाच्या वाहतुकीसाठी केला जाईल.

पर्यावरणास अनुकुल लाॅजिस्टिकचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हि पाईपला ईन होय.

लाॅयड्स मेटल्सने नाविन्यपूर्ण कार्यप्रणाली आणि संसाधन व्यवस्थापनाद्वारे पर्यावरणाचा समतोल राखत आर्थिक विकासाचे लक्ष्य पुढे ठेवले आहे.शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी ‘इको-काॅन्शस’ पद्धतींना प्राधान्य देत लाॅयड्स मेटल्स पुढे जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here