कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर येथे सोयाबीन तारण योजनेला सुरुवात
राजु झाडे
चंद्रपूर:- कृषी उत्पन्न बाजार समिती, चंद्रपूरचे मुख्य बाजार रामनगर चंद्रपूर येथे दि.02-11-20 रोज सोमवार पासून कृषी उत्पन्न बाजार समिती व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व चंद्रपूर जिल्हा मध्य. सहकारी बँक,चंद्रपूर यांच्या सहकार्याने शेतमाल तारण योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल निघतो तेव्हा शेतमालाची आवक जावक चे प्रमाण वाढत असते. अडचणीच्या कारणास्तव शेतकरी आपला माल कमी भावात विक्री करतात. यामध्ये फायदा होतो तो व्यापारी वर्गाचा. शेतमालाची आवक कमी झाली की मात्र मालाचे भाव वाढविले जातात. त्यामळे भावाढीचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा या दृष्टीने शेतकाऱ्यांकरिता सोया, तूर, चणा इ. शेतमाल तारण योजना राबविण्यात येत आहे.
शेतमाल तारण योजना फायद्याची असून सदर योजनेचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा. व योग्य तो उचित भाव मिळवावा. सदर योजनेत शेतमाल ठेवल्यास बाजार समिती कडून ताबडतोब 75% रक्कम तारण कर्ज म्हणून मिळते. बाजार समितीने स्वनिधीतून दिलेल्या रक्कमेवर 6% द.सा.द.शे. प्रमाणे व्याज आकारणी करण्यात येते.
विमाखर्च , गोदामभाडे इत्यादी शेतकऱ्यांना माफ करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती श्री दिनेश दा. चोखरे व उपसभापती श्री रणजित बा. डवरे व सचिव संजय पावडे करीत आहेत.