लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड व लाॅयड्स इन्फिनिट फाउंडेशन तर्फे कृषी कार्यशाळेचे आयोजन
लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन तर्फे पांढरकवडा येथे कृषी मेळावा आयोजित ११ गावातील १२५८ शेतकरी उपस्थित
२३ सप्टें. २४ घुग्गुस : लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन (लॉयड्स मेटल्सचा सामाजिक दायित्व विभाग) तर्फे पंचमुखी हनुमान मंदिर सभागृह पांढरकवडा येथे कृषी मेळावा आयोजित आला होता. या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून चंद्रपूर तालुका कृषी अधिकारी श्री. अनिकेत माने आणि लॉयड्स मेटल्स चे श्री.वाय. जी. एस. प्रसाद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच लॉयड्स मेटल्सचे उपाध्यक्ष श्री. प्रशांत पुरी, साईनाथ खेडेकर, श्री. गावंडे, नम्रपाली गोंडाने तर सरपंच निविदिता ठाकरे, संध्या पाटिल, पुष्पा मालेकर, सुरज तोतडे, इंदिराबाई पोळे, संजय उकीणकर, अनुराग मत्ते, अरविंद चौधरी उपस्थित होते.
या मेळाव्यात कपाशी व सोयाबीन पिकावर मार्गदर्शन, शासकीय योजनाची माहिती, जंगली जनावरापासून शेतीचे संवरक्षण मार्गदर्शन कार्यक्रम आणि पिकांना पाणी कशे द्यायचे याचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना नॅनो युरिया डी ए पी, कामगंध सापाळे सोलर लॅम्प, किचन गार्डन किट वाटप करण्यात आली. मेळाव्यात म्हातारदेवी, उसगांव, नकोडा, वढा, पांढरकवडा, शेणगाव मुरसा, बेलसनी, धानोरा, पिंपरी, अंतूर्ला सोनेगाव अशा एकूण ११ गावांमधून १२५८ शेतकरी उपस्थित होते.
सामाजिक उत्तरदायित्वाच्या आपल्या संकल्पाला पूर्णत्त्वास नेत लॉईड्स इंफिनाईट फाऊंडेशन घुग्गुस येथील विकासाच्या विविध उपक्रमांमध्ये अग्रणी भूमिका बजावत आहे. हया उपक्रमां चा उद्देश्य स्थानिक तरुणांना सक्षम करणे, सार्वजनिक आरोग्य सुधारणे, पायाभूत शैक्षणि क सुविधांमध्ये वाढ करणे आणि स्थानिकांसाठी उपजीविकेच्या आणि अर्थार्जना च्या नव्यासंधी निर्माण करणे हाच आहे.