राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकांची सकाळच्या दारू विक्रीस मुक संमती?

0
6

राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकांची सकाळच्या दारू विक्रीस मुक संमती समजायची का?

राजुरा:राजुरा शहरातील वाढती दारू विक्री आणि व्यसनाधीनता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरत आहे. शहरातील बार आणि दारू दुकानांच्या सकाळपासून सुरू होणाऱ्या विक्रीला स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांची मुक संमती आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नियमांनुसार, बार आणि अनुज्ञप्तीधारक दुकाने ठराविक वेळेनंतरच सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र, राजुरात सकाळीच दारू विक्री सुरू असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. यामुळे शहरातील तरुणाई व्यसनांच्या आहारी जात असून, शहरातील गुन्हेगारी वाढीस लागली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या धोरणामुळेच दारू विक्रीला परवानगी मिळत असल्याचे आरोप होत आहेत. नागरिकांच्या मते, निरीक्षकांच्या दुर्लक्षामुळेच दारूची विक्री ठरलेल्या वेळेच्या आधीच सुरू होत आहे, ज्यामुळे राजुरा शहराचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे.

प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे असून, या विक्रीसाठी परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here