घुग्घुस येथील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
घुग्घुस : येथील विविध पक्षाचे कार्यकर्ते रविवार, १५ सप्टेंबर कार्यकर्त्यांसह राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपात प्रवेश केला.
याप्रसंगी राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांनी युवा नेते अनुप भंडारी व कार्यकर्ते अजय त्रिवेणी, कविता विष्णुभक्त,एकटम्मा तग्रम, ममता उपलेटी, शकिला सखद, विजया पेरपुल्ला, अजय पचोर, अजय पानम, प्रिन्स सिलका, संजय कोटा, संतोष गणगोणी, रंगा शेट्टी, विजय कोटा, भारत कोंड्रा अशा अनेक कार्यकर्त्याच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून भाजपा पक्षात त्यांचे स्वागत केले.
रविवारला युवा नेते अनुप भंडारी यांचा वाढदिवस असल्याने आणि वाढदिवसाच्या दिवशी भाजपात प्रवेश घेतल्याने केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी जि. प. सभापती नितु चौधरी, प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे,भाजपाचे संतोष नुने, विनोद चौधरी,चिन्नाजी नलभोगा, सुचिता लुटे, वैशाली ढवस, सुनील बाम, हेमराज बोंबले, सतीश बोन्डे, विवेक तिवारी, विनोद जंजर्ला, तुलसीदास ढवस, अमीना बेगम व मोठया संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.