घुग्घुस शहरात जय श्रीराम गणेश मंडळातर्फे सर्वधर्मीय महाआरती…

0
10

घुग्घुस शहरात जय श्रीराम गणेश मंडळातर्फे सर्वधर्मीय महाआरती…

सर्वधर्मीय महाआरती ही घुग्घूसच्या एकात्मतेचे प्रतीक! – देवराव भोंगळे

 

घुग्घुस, दि.१७ :- स्थानिक गांधी चौकातील जय श्रीराम गणेश मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही रविवारी, (दि. १५) सायंकाळी सर्वधर्मसमभाव जोपासणारी परंपरा कायम ठेऊन सामुहिक महाआरती करण्यात आली.

या महाआरतीला राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे, वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभास सिंग,भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर, माजी जि. प. सभापती सौ. नितु चौधरी,भाजपाचे संजय तिवारी, निरीक्षण तांड्रा,संतोष नुने,विनोद चौधरी,प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ.किरण बोढे यांचेसह हिंदू, मुस्लिम, बौद्ध,इसाई,शिख समाजाचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेशाची महाआरती करण्यात येऊन मंडळाकडून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

शहरातील सर्वधर्मीय महाआरती ही मिनी इंडिया असणाऱ्या घुग्घूसमध्ये एकात्मतेचे प्रतीक आहे.चंद्रपर जिल्ह्यातील घुग्घुस हे प्रमुख औद्योगिक शहर असल्याने सर्व जाती धर्माचे लोक याठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात. हे मागील आठ वर्षांपासून चालत आलेल्या या सर्वधर्मीय महाआरतीच्या अखंड परंपरेतून दिसून येते. सर्व धर्मीयांना सोबत घेऊन महाआरतीची ही परंपरा म्हणजे सर्वधर्म समभावाची प्रेरणा आहे. असे प्रतिपादन राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष सुनील बाम, धनराज पारखी, सुरेंद्र जोगी, सुरेंद्र भोंगळे,विवेक (गुड्डू) तिवारी, हेमंत कुमार,असगर खान,गणेश कुटेमाटे, कोमल ठाकरे, मारोती मांढरे,विनोद जंजर्ला, गणेश राजूरकर,सतीश बोन्डे,राजू काळे यांचेसह आदिंची कष्ट घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here