बसच्या धडकेत एकाचा मृत्यू

0
18

बसच्या धडकेत एकाचा मृत्यू

 

राजुरा : गडचांदूर – राजुरा मार्गावर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कापणगाव जवळील पेट्रोल पंप जवळ कापणगाव येथील रहिवाशी प्रकाश बोढेकर (वय ५०) हे राजुरा येथून सायंकाळी सात वाजता घराकडे येत असताना यांच्या मोटरसायकलला गडचांदूर कडून येणाऱ्या बसने धडक दिल्याने प्रकाश बोढेकर यांचा जागीच मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार प्रकाश बोढेकर हे काही कामानिमित्त राजुरा येथे गेले होते. सायंकाळी सात वाजता काम करून मोटार सायकल क्रमांक एम एच ३४ ए क्यू १४६४ या वाहांने घराकडे येत असताना हाकेच्या अंतरावर असलेल्या पेट्रोल पण जवळ गडाचांदुर कडून येणाऱ्या बस क्रमांक एम एच 40 एन 94 60 जोरदार धडक दिल्याने प्रकाश बोढेकर यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी होताच घटनास्थळी गर्दी केली. काही वेळातच राजूरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठविले आहे. प्रकाश बोढेकर यांना दोन मुले व पत्नी असून त्यांच्या मृत्यूमुळे परिवारावर मोठे संकट ओढावले आहे. समोरील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here