माता महाकाली महोत्सवाची पहिली निमंत्रण पत्रिका मातेच्या चरणी अर्पण
आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
७ ऑक्टोबरपासून चंद्रपूरात सुरू होत असलेल्या पाच दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाची पहिली निमंत्रण पत्रिका आज श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टच्या वतीने महाकाली मंदिरात जाऊन मातेच्या चरणी अर्पण करण्यात आली.
यावेळी महोत्सव समितीचे संयोजक आमदार किशोर जोरगेवार, कल्याणी किशोर जोरगेवार, सचिव अजय जैस्वाल, कोषाध्यक्ष पवन सराफ, विश्वस्त सुनील महाकाले, मिलिंद गंपावार, राजेंद्र शास्त्रकार, चंद्रकांत वासाडे, श्याम धोपटे, अशोक मत्ते, राजेंद्र जोशी, वंदना हातगावकर, सविता दंडारे आदींची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून दरवर्षी चंद्रपूरात आयोजित होत असलेल्या श्री माता महाकाली महोत्सवाला यंदा ७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. यंदाचा हा महोत्सव पाच दिवस चालणार असून या पाच दिवसांत भरगच्च विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात जगप्रसिद्ध कलावंत सहभागी होणार आहेत.
दरम्यान, आज शुक्रवारी महोत्सवाची पहिली निमंत्रण पत्रिका चंद्रपूरच्या आराध्य दैवत महाकाली मातेच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे. यावेळी मातेची विधिवत पूजा करत शुभकार्याची सुरुवात करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या महोत्सवाचीही जय्यत तयारी सुरू आहे. महोत्सवाच्या माध्यमातून येथील पर्यटन आणि अर्थकारणाला चालना मिळावी तसेच चंद्रपूरच्या मातेची महती देशभरात पोहोचावी या दिशेने महोत्सव ट्रस्ट काम करत असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
यावेळी श्री माता महाकालीची थोरली बहीण समजल्या जाणाऱ्या एकोरी मंदिरातील एकवीरा माता आणि जगन्नाथ बाबा मठ येथेही निमंत्रण पत्रिका अर्पण करण्यात आली आहे.