राजुरा नगर परिषदेने वाढविलेला मनमानी कर मागे घ्या – सुरज ठाकरे

0
93

राजुरा नगर परिषदेने वाढविलेला मनमानी कर मागे घ्या – सुरज ठाकरे

राजुरा नगर परिषदेने इतर नगरपरिषद व नगरपंचायत इंची कर प्रणाली पाहता अचानकच त्यांच्यापेक्षा तिप्पटीने राजुरा शहरातील नगरपरिषद क्षेत्रातील रहिवासी व व्यावसायिक इमारतींवर कर वाढ करण्यात आलेली आहे. ज्यामुळे व्यावसायिक तसेच सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश व नगरपरिषदेच्या न्यानिर्णयाविरोधामध्ये असंतोष उफाळतो आहे.

खरे पाहता दर चार वर्षांनी दहा टक्के कर वाढवावा हे अपेक्षित असताना देखील तसे न करता राजुरा नगरपरिषदेने 30% ते 40% टक्के कर वाढ करून सामान्य जनतेवर व्यापाऱ्यांवर मोठा आर्थिक डाका टाकला आहे असा आरोप सुरज ठाकरे यांनी केला आहे.

आधीच सामान्य जनता ही महागाईने त्रस्त झालेली असून विधानसभा क्षेत्रातील शासकीय आरोग्य सुविधा व शैक्षणिक सुविधा या व्हेंटिलेटरवर सामान्य जनतेचा व मध्यमवर्गीयांचा तसाच व्यापाऱ्यांचा कमाईचा खूप मोठा हिस्सा या सर्व बाबींवर खर्च होत आहे. तसेच दैनंदिन गरजांच्या वस्तूंच्या वाढत असलेल्या किमतींपासून देखील जनता त्रस्त आहे.

त्यात राजुरा नगरपरिषदेने घेतलेला हा इंग्रजी तुगलकी फर्मानच आहे असा आरोप सुरज ठाकरे यांनी केला आहे.

हा निर्णय मागे न झाल्यास मोठे आंदोलन नगर परिषदेच्या विरोधामध्ये संपूर्ण राजुरा शहराचा सहभाग घेऊन उभारण्यात येईल अशी चेतावणी वजा इशारा सुरज ठाकरे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये नगरपरिषद ला दिला आहे

जनसामान्यांमध्ये देखील नगरपरिषद ने वाढविलेल्या करा बाबत असंतोष दिसून येत आहे.

नगरपरिषदेने आपल्या निर्णयामध्ये सुधारणा न केल्यास भविष्यामध्ये राजुरा यामध्ये मोठे आंदोलन नगरपरिषद विरोधात पाहायला मिळेल यात काही शंका नाही

नगरपरिषदेची भूमिका आता यावर काय राहील याकडे संपूर्ण राजुऱ्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here