गडचांदूर येथील मुक्तीधाम कडे नगरपरिषद चे दुर्लक्ष
आम आदमी पक्षाने केली नूतनीकरणाची मागणी
गडचांदूर- सविस्तर वृत्त असे की, गडचांदूर येथील मुक्तीधाम मध्ये ज्या ठिकाणी प्रेत जाळल्या जाते त्या ठिकाणी बांधलेल्या शेड चे टिन निघालेल्या अवस्थेत असल्याने प्रेत जळत असताना मोकळ्यात छप्पर मधून चितेवर पाणी पडत असल्याने प्रेत पूर्ण पणे जळण्यास बाधा निर्माण होत असल्याच्या काही घटनांनी गडचांदूर वासियांनमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत स्थानिकांनी नगरपरिषद येथे तक्रारी केल्या असून देखील याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे हे एकंदर सध्याच्या अवस्थेवरून दिसून येते. नगरपरिषदेच्या होत असलेल्या दुर्लक्षाला कंटाळून येथील नागरिकांनी दिनांक- 05/ सप्टेंबर/2024 रोजी गडचांदूर येथील आम आदमी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कामगार जिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असता क्षणाचाही विलंब न करता श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी आम आदमी पक्षाचे गडचांदूर शहर अध्यक्ष श्री. मोलिंद सोनटक्के आणि आम आदमी पक्ष राजुरा विधानसभा क्षेत्राचे प्रवक्ते श्री. कुणाल चन्ने यांनी मुक्ती धामाची प्रत्यक्ष पाणी करून झोपलेला प्रशासनाला जागे करण्याकरिता चित्रीकरण केले. चित्रीकरणांमध्ये मुक्तिधाम मध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी असलेल्या संसाधनाची सदस्थितीत असलेली दुरावस्था बघून मेल्यानंतरही मुक्तिधाम मध्ये मुक्ती मिळेल की नाही.? असा प्रश्न पडणारी अवस्था या ठिकाणी दिसून येते. याशिवाय या ठिकाणी क्षणभर विश्रांतीसाठी तथा मोन/ श्रद्धांजली साठी करण्यात आलेल्या बांधकामाच्या ठिकाणी नेहमीच लॉक लावून राहत असल्याच्या प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिल्या. “या ठिकाणी दुःखांचा डोंगर कोसळलेले व्यक्ती आपल्या दुःखात आले असताना जेव्हा येथील परिस्थिती बघतात तेव्हा त्यांना येथील निष्कृष्ट दर्जाचे झालेले बांधकाम आणि याकडे होत असलेले प्रशासनाचे दुर्लक्ष बघून आणखी दुःख होतं हे निश्चित. करिता गडचांदूर वासियांच्या भावनेच्या विचार करून आज दिनांक- 06/ सप्टेंबर/2024 रोजी गडचांदूर नगरपरिषद येथे श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर मुक्तीधामाचे तात्काळ नूतनीकरण करून मृताला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देण्याकरिता सदर समस्या मार्गी लावण्याकरिता आम आदमी पक्ष, गडचांदूर तर्फे गडचांदूर नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी श्री. नंदकिशोर सातपुते यांना निवेदन देण्यात आले. यावेळेस उपस्थित आम आदमी पक्षाचे पदाधिकारी मिलिंद सोनटक्के,कुमार कोचेवार, सुरेंद्र टोंगे, मंगेश बदखल, के. बी. दुर्गे आदी पदाधिकारी तथा सहकारी उपस्थित होते.