चंद्रपूर जिल्ह्यातील OYO हॉटेल्सची कायदेशीर चौकशी करा – नरेंद्र सोनारकर

0
113

चंद्रपूर जिल्ह्यातील OYO हॉटेल्सची कायदेशीर चौकशी करा – नरेंद्र सोनारकर


अमोल राऊत
बल्लारपूर – ओडिशाच्या रितेश अग्रवाल यांनी 2013 मध्ये स्थापन केलेले OYO हॉटेल्स आज भारतभर विस्तारलेले आहेत. शेकडो हॉटेल्स सरकारी यंत्रणेत नोंदले गेले आहेत, परंतु नियम धाब्यावर बसवून गल्लीबोळात उभारण्यात आलेली OYO हॉटेल्स आज कपल्ससाठी शरीरसुखाचा अड्डा बनत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी या हॉटेल्समध्ये गैरप्रकार घडत असून, काही अल्पवयीन मुलींचा शारीरिक शोषणासाठी बळी घेतला जात आहे.

पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य संघटक नरेंद्र सोनारकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व OYO हॉटेल्सची कायदेशीर चौकशी करण्याची आणि बेकायदेशीरपणे चालवली जाणारी हॉटेल्स त्वरित सील करण्याची मागणी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. बल्लारपूर येथे नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली असून, OYO हॉटेल संचालकांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आणि तीव्र बदनामीमुळे तिने आत्महत्या करून आपला जीव गमावला.

सोनारकर यांच्या मते, OYO हॉटेल्स केवळ नफा कमावण्यासाठी संचालकांकडून कोणत्याही कागदपत्रांची योग्य तपासणी न करता खोली दिली जाते. परिणामी, अनेक बेकायदेशीर घटना या ठिकाणी घडत आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यातील इतर OYO हॉटेल्समध्येही असे प्रकार घडत असतील का, याबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक OYO हॉटेलची कायदेशीर चौकशी करून, बेकायदेशीरपणे चालवली जाणारी हॉटेल्स तातडीने बंद करण्यात यावीत, अशी सोनारकर यांची ठाम मागणी आहे.

लवकरात लवकर पुरोगामी पत्रकार संघाचे शिष्टमंडळ या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आवाहन करणार आहेत. राज्यभरात आणि देशभरात वासणांधतेच्या वाढत्या गुन्हेगारी कृत्यांमुळे महिलांपासून ते लहान मुलींपर्यंत कोणीही सुरक्षित राहिले नाहीत. या परिस्थितीत पोलीस विभाग, पालकवर्ग, शिक्षकवर्ग आणि जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन या घटनांना आळा घालण्याची गरज आहे, असेही सोनारकर यांनी आवाहन केले आहे.

पुरोगामी पत्रकार संघाचे आवाहन – तत्काळ कारवाईसाठी सज्ज व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here