डॉ. अण्णाभाऊ साठेंचे कार्य प्रत्येकाच्या जिवनासाठी प्रेरणादायी- खा. प्रतिभा धानोरकर

0
123
डॉ. अण्णाभाऊ साठेंचे कार्य प्रत्येकाच्या जिवनासाठी प्रेरणादायी- खा. प्रतिभा धानोरकर

साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा 104 वा जयंती सोहळा जिवती येथे सपन्न

साहित्यिकांच्या साहित्याने जिवनाला नविन दिशा मिळत असते. साहित्य रत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे देखील साहित्य प्रत्येकाच्या जिवनाला प्रेरणा देणारे आहे, असे उद्गार खासदार प्रतिभा धानोरकर यांनी साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती सोहळ्या निमित्त आयोजित जिवती येथील कार्यक्रमात केले.

दलित साहित्याचे संस्थापक म्हणून डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा उल्लेख होत असला तरी त्यांचे साहित्य प्रत्येकांच्या जिवनाला दिशा देणारे आहे, तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांची भुमिका व त्यांचे साहित्य प्रत्येकाच्या जिवनाला नविन दिशा देणारे आहे, असे मत यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती  सोहळ्याचे आयोजन 31 ऑगस्ट रोजी डॉ. अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर जिवती येथे करण्यात आले होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या आयोजकांच्या वतिने सत्कार देखील करण्यात आला. जिवती तालुका प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले. यावेळी मंचावर माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, डॉ. अंकुश गोतावळे,सुग्रीव गोतावळेजेष्ठ नागरीक भोजुपाटील गायकवाड यांच्या सह अनेक नागरीकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here