चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गाैंड यांनी रेती तस्करांच्या विराेधात कंबर कसली!
चार रेतींची वाहने जप्त, त्यापैकी एक वाहन पाेलिस स्टेशनला जमा!
चंद्रपूर । किरण घाटे
चंद्रपूर जिल्ह्यात रेती उपलब्ध असलेले अंदाजे १५० रेती घाट आहे परंतु या वर्षि एकाही रेती घाटांचा लिलाव झाला नाही. याच संधीचा फायदा घेत जिल्हाभर रेती तस्कारांनी दिवस रात्र वाहनांनी अवैध रेती नेण्यांचा सपाटा सुरु केला हाेता .दरम्यान चंद्रपूर तालुक्यात अधुन मधुन महसुल प्रशासनाच्या कारवायां सुरु हाेत्या.
माेठ्या हिंमतीने व युक्तीने रेती तस्कर नदी व नाल्यांची वाहनांने रेती प्रयत्न करीत हाेते .अश्यातच चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार निलेश गाैंड व त्यांचे महसुल पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शहरातील बिनबा गेट परिसरात दाेन दिवसांपुर्वि सकाळी सकाळी चार अवैध रेती वाहनांवर कारवाई केली .त्या कारवाईतील एक वाहन शहर पाेलिस स्टेशनला जमा करण्यांत आले .तर तीन (अवैध रेतीची वाहने )दंडात्मक कारवाईसाठी तहसिल कार्यालयात जमा केल्याचे खात्रीलायक व्रूत्त आहे .या पुर्वि तहसीलदार गाैंड यांनी चंद्रपूर तालुक्यातील विविध भागात अवैधरित्या रेतींची वाहने पकडुन वाहने मालकां कडुन ४३लाखांपेक्षा अधिक दंड वसुल करुन ताे खजीना दाखल केला हाेता .सदरहु धडक कारवायांमुळे त्या वेळी तालुक्यातील अवैध रेती तस्करांचे अक्षरशा धाबे दणाणले हाेते .पण परत काही दिवसांनी अवैध रेती तस्करांनी आपले डाेके वर काढले. अवैध रेती माफियांचे रेती नेण्याचे सर्व प्रयत्न माेडुन काढण्यांसाठी तथा अवैध रेती वाहनांवर अंकुश ठेवण्यासाठी तहसीलदार निलेश गाैंड यांनी रेती तस्करां विराेधात आता प्रत्यक्षात कंबर कसली असल्याचे एकंदरीत दिसुन येते. बिनबा गेट परिसरात अवैध रेती वाहनांवर कारवाई करतांना तहसीलदार निलेश गाेैंड यांचे साेबत महसुल विभागाचे नायब तहसीलदार राजू धांडे , मंडळ अधिकारी रमेश आवारी ,अशाेक मुसळे ,तलाठी प्रकाश सुर्वे , अनवर शेख , राहुल धाेंगडे आदि हजर हाेते. दरम्यान या कारवाईचे चंद्रपूरकरांनी स्वागत केले आहे.