सिंधी ग्रामपंचायतीत पाण्याची टंचाई: नागरिकांची दररोजची वणवण..
राजुरा: राजुरा तालुक्यातील सिंधी ग्रामपंचायतीत गेल्या १५ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांना रोज पाण्यासाठी वणवण भटकंती करासिंधी ग्रामपंचायतीत पाण्याची टंचाई: नागरिकांची दररोजची वणवणवी लागत आहे. जल जीवन मिशन अंतर्गत पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे, मात्र, पाण्याचा ठणक नळाला पोहोचत नाही, त्यामुळे नागरिकांची अस्वस्थता वाढली आहे.
पर्यायी उपाय म्हणून गावातील जुनी विहीर वापरण्याचा विचार केला गेला, परंतु विहीर देखील अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे. विहिरीत काडी-कचरा, चपला-जोडे, आणि इतर घाणीचे साम्राज्य पसरले आहे, ज्यामुळे पाणी नेणे तर दूरच, परंतु या विहिरीतील पाण्याचा वापर करणे देखील धोकादायक ठरू शकते.
सिंधी गावातील नागरिकांमध्ये या परिस्थितीबाबत तीव्र नाराजी पसरली आहे. प्रशासनाने या परिस्थितीकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. जल जीवन मिशन अंतर्गत केलेल्या पाइपलाइनच्या कामावर पुनर्विचार करणे गरजेचे आहे, तसेच जुनी विहीर स्वच्छ करून त्वरित पाण्याचा योग्य पुरवठा सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
गावातील जनतेने प्रशासनाकडे तातडीने या प्रश्नावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, कारण पाण्याच्या अभावामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर समस्येचा तात्काळ विचार करून प्रशासनाने योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे.
कोट: “दोन दिवसांत योग्य रित्या पहिले पेक्षा उत्तम प्रकारे नवीन पाइपलाइन द्वारे पाणी सुरू होईल. पाणी पुरवठा हा नवीन टाकीचे काम सुरू असल्यामुळे ८-१० दिवसांपासून बंद आहे. गावातील दोन स्वच्छ विहिरींवर नागरिक मोटारद्वारे पाणी घेत आहेत. जी विहीर बंद आहे त्यावर तर गावातील लोक बोलणारच”.
– रामभाऊ ढूमने
सरपंच ग्रामपंचायत सिंधी