अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करा – हेमराज बावणे

0
135

अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करा – हेमराज बावणे

 

घुग्घुस येथील (उबाठा) शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमराज बावणे यांनी अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावे अशी मागणी निवेदनातून घुग्घुस पोलीस निरीक्षकातर्फे करण्यात आली.

आपल्या देशामध्ये व राज्यामध्ये लैंगिक अत्याचारांच्या घटनेमध्ये वाढ होत आहे . तसेच दुर्गापूर येथील एका अल्पवयीन मुलीवर पानठेला चालकाने लैंगिक अत्याचार केला. त्या अल्पवयीन मुलीने खऱ्याचे उधारीचे पैसे नाही दिल्याने पानठेला चालकाने लैंगिक अत्याचार केला, नागभिड येथे एका मनोरुग्ण महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली,ब्रह्मपुरी येथे सतत दोन वर्षापासून एक पि.टी. शिक्षकाने दहावीच्या शिक्षण घेणाऱ्या नाबालिक विद्यार्थिनीवर सतत अत्याचार करत होता,अशा अनेक अत्याचार आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये व देशांमध्ये घडत आहे, अशा अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोर कारवाई, शिक्षा करण्यात यावी.

याप्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमराज बावणे, शिवसेना शहरप्रमुख बंटी घोरपडे, युवासेना शहरप्रमुख चेतन बोबडे, शिवसेना नेते सुधाकर (बालू) चिकनकर, वेदप्रकाश जी महेता, शिवसेना उपशहर प्रमुख अनुप कोंगरे,निखिल मोहितकर अनेक शिवसैनिक, युवासेना उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here