कु. क्षमा घागरगुंडे यांची JNU दिल्ली मध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी निवड
राजुरा:श्रुष्टी बहुउद्देशीय संस्था गडचांदूर द्वारा संचालित एकलव्य इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वरोड्याच्या विद्यार्थिनी कु. क्षमा दिनेश घागरगुंडे हिने आपल्या अथक परिश्रमाने महाराष्ट्रात अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून एकमेव स्थान मिळवून जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), दिल्ली येथे पदवी अभ्यासक्रम (रसियन भाषा) साठी देशभरात 11वा क्रमांक मिळवला आहे.
कु. क्षमा दिनेश घागरगुंडे हिने 10वी व 12वीच्या नागपूर बोर्डाच्या परीक्षांमध्ये मेरिटमध्ये स्थान मिळवून आपल्या शालेय जीवनातच उल्लेखनीय यश संपादन केले होते. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक सर्वत्र होत आहे.
सदर निकाल CUET परीक्षेच्या आधारावर जाहीर करण्यात आला. देशातील सर्व नामांकित विद्यापीठांची प्रवेशित विद्यार्थी यादी रविवारी, 25 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर झाली, ज्यात कु. क्षमा घागरगुंडे हिचा समावेश आहे.
कु. क्षमा हिच्या या यशाचे श्रेय तिच्या कठोर परिश्रमांना जात असून, तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्रुष्टी बहुउद्देशीय संस्था गडचांदूरचे अध्यक्ष मा. प्रा. अनिल पोडे, सचिव मा. प्रा. आशिष देरकर, संचालक मंडळ, प्राचार्या प्रा. पौर्णिमा वडस्कर (पोडे मॅडम), उपप्राचार्य प्रा. दिनेश घागरगुंडे, पर्यवेक्षक प्रा. मोरेश्वर लांडे सर, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिच्या या यशाचे अभिनंदन केले आहे व तिच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.