शिवाजी माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा भारी येथे स्वर्गीय प्रभाकर मामुलकर यांना पुण्यस्मरण दिनी विविध कार्यक्रमांनी आदरांजली अर्पण

0
144

शिवाजी माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा भारी येथे स्वर्गीय प्रभाकर मामुलकर यांना पुण्यस्मरण दिनी विविध कार्यक्रमांनी आदरांजली अर्पण

 

राजुरा : आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी आमदार स्वर्गीय प्रभाकरराव मामुलकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवाजी माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा, भारी येथे विविध उपक्रमांद्वारे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सगुणाकर भेंडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार आणि प्रबोधनकार संतोष कुंदोजवार, वनरक्षक सुरेश गिरटकर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय प्रभाकर मामुलकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर सर्व मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. मुख्याध्यापक सगुणाकर भेंडे आणि इतर मान्यवरांनी प्रभाकर मामुलकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर मार्गदर्शन केले.

प्रबोधनकार संतोष कुंदोजवार यांनी मानव विकासातील शिक्षणाचे महत्त्व सांगितले आणि विज्ञान युगात अंधश्रद्धा कशी वाढत आहे यावर प्रकाश टाकला. त्यांनी विविध प्रयोगांच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन कसा महत्त्वाचा आहे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. वनरक्षक सुरेश गिरटकर यांनी वने आणि वन्यजीव यांच्याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे संचालन सहायक शिक्षक टी. एस. गिरमाजी यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक डब्ल्यू. एस. पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहायक शिक्षक के. पी. वनकर, ए. एस. गेडाम, डी. एम. राठोड, के. एस. मालखेडे, एस. जी. पिंपळकर, डी. एम. बोधे, कुमारी जे. एच. डोंगरे, कु. एम. डी. सातपुते, कु. एस. पी. गिरटकर, बी. व्ही. नागोसे, ई. बी. सातपुते, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here