कोलकाता आणि बदलापूर येथील घटनांच्या विरोधात भव्य कँडल मार्च व रक्षाबंधन कार्यक्रम

0
78

राजुरा: काल दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी देशात मुलींवर होणाऱ्या अमानुष बलात्काराच्या विरोधात कोलकाता आणि बदलापूर येथील घटनांच्या निषेधार्थ राजुरा शहरात भव्य कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले. या मार्चचे नेतृत्व राजुरा विधानसभेचे तडफदार व उच्च शिक्षित उमेदवार भुषण फुसे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ७ वाजता झाली आणि त्यात अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला.

 

रक्षाबंधनाच्या निमित्ताने, आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांच्या हस्ते भुषण फुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, एका शेतकरी आत्महत्या ग्रस्त बहिणीला मान सन्मान देऊन तिच्या हाताने कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी भुषण फुसे यांनी आपल्या भाषणात शेतकरी, महिला, युवती, आणि विद्यार्थिनी यांच्या न्याय हक्कांसाठी मजबूत ताकदीने लढण्याचा मानस व्यक्त केला.

 

संपूर्ण कार्यक्रम अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. उपस्थितांनी न्यायाच्या मागणीसाठी आपल्या आवाजात आवाज मिसळून बलात्काराच्या घटना थांबविण्यासाठी कठोर कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.

बहुजनांच्या महापुरुषांना अभिवादन करण्यात आले आणि “फाशी द्या फाशी द्या, गुन्हेगारांना फाशी द्या” चे जोरदार नारे देण्यात आले. यावेळी या कँडल मार्चला ३०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता सोबतच नागवंश युथ फोर्स बहुउद्देशिय संस्था राजुरा चे अध्यक्ष अमोल राऊत व सचिव धनराज उमरे, सदस्य रवि झाडे यांचा सुद्धा पाठिंबा होता.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनुसया मॅडम,नळे मॅडम,सुशील मडावी, राकेश चिल्कुलवार,सनी रेड्डी, सदानंद मडावी, सुभाष हजारे ,रामदास धानोरकर, भगीरथ वाकडे,रवी आत्राम, धनंजय बोर्डे, लोंढे ताई उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here