लेआऊट धारकांच्या प्रतापामुळे दसवारू नाल्यालगतचा परिसर जलमय

0
171

लेआऊट धारकांच्या प्रतापामुळे दसवारू नाल्यालगतचा परिसर जलमय

घरात पाणी घुसल्याने जनजीवन झाले विस्कळीत

राजुरा, १९ जुलै :- काल झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाल्याने नालंदा नगर येथील घरात पाणी घुसले. यामुळे काही काळ या ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली. याचा नागरिकांना मोठा फटका बसला.

राजुरा तालुक्यातील बामणवाडा येथील नालंदा नगर आणि अंगद नगर भागात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. या पावसामुळे लोकांच्या घरात ३ ते ४ फूट पाणी साचले आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाणी साचल्यामुळे रस्ते, गल्ली आणि घरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. अनेक लोकांना त्यांच्या घरातील वस्तू बाहेर काढण्यासाठी खूप कष्ट करावे लागत आहेत. काही घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे विद्युत उपकरणे आणि फर्निचर यांचा मोठा हानी झाली आहे.

या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रमाण आढळून येण्यासाठी प्रशासनाने सर्वेक्षण सुरू केले आहे. पाण्याचा निचरा झाल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे नियोजन सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना धीर धरावा आणि त्यांची मदत करण्यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करीत आहे, असे आश्वासन दिले आहे.

बामणवाडा येथील सारडा गोडाऊन जवळ काँक्रिट रस्ता गेला वाहून…
पावसाचे पाणी रस्त्याच्या आरपार वाहून जाण्यासाठी कॉक्रीट रस्त्याच्या खाली काँक्रिट भोंगे टाकण्यात आले होते. मात्र पाण्याचा ओघ भयंकर असल्याने भोंगे वाहून जाऊन त्याठिकाणी पाच ते सहा फूट एवढे भलेमोठे बगदाड पडले असल्याने या रस्त्याने अवजड वाहने जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अंगद नगर, सिद्धार्थ लेआऊट, पंचवटी लेआऊट, इंडियन गॅस एजन्सी याठिकाणी पावसाच्या पाण्याने तळे बनल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शाळेचे वॉल कंपाऊंट व काही सुरक्षा भिंती पडल्याची माहिती आहे.

रस्त्यामुळे (बांधकाम प्रगतीपथावर असलेला महामार्ग) अडथळा…
सध्या बांधकाम सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण होत असल्याने बामणवाडा येथील महामार्गाला लागून असलेल्या शेतजमिनी पाण्याखाली आल्याने शेतपिंकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here