- राजुरा तालुक्यातील शाळा वेळापत्रक बदलूनही जुन्याच वेळेवर सुरू
राजुरा १९ जुलै :- राजुरा तालुक्यातील काही शाळा प्रशासनाच्या नवीन वेळापत्रकानुसार कार्यरत न राहता जुन्या वेळेवरच शाळा सुरू ठेवत आहेत, असा आरोप पालकांनी केला आहे.
तालुका शिक्षण विभागाने शाळांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले होते. ज्यामध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, १ ते पाच या वर्गापर्यंत शाळेची सुरुवात सकाळी ९ वाजता करण्याचे निर्देश दिले होते. परंतु काही शाळा अजूनही सकाळी ७.५० वाजता सुरू होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे, असे पालकांनी म्हटले आहे.
पालक या नात्याने अमोल राऊत यांनी बाबतीत तालुका शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, या शाळांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. या समस्येवर त्वरित तोडगा काढला जावा अशी पालकांची अपेक्षा आहे. शिक्षण विभागाने या संदर्भात चौकशी करून शाळांना योग्य वेळेवर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
तालुका ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर विजय परचाके यांनी सांगितले की, “आम्ही या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतली आहे. संबंधित शाळांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि वेळापत्रकानुसार शाळा सुरु होतील याची खात्री केली जाईल.”
शाळांनी वेळापत्रकाचे पालन करणे आवश्यक आहे, हे सुनिश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे एकत्र काम करणे आवश्यक आहे.
संबधित अधिकाऱ्यांसोबत बोलल्यानंतर अशी माहिती समोर आली की सर्व नर्सरी ते 5वी या वर्गाचा वेळापत्रक ९ वाजता केला असुन सर्व शाळांना त्याची सूचना व परिपत्रक अगोदरच दिल्याचे त्यानी सांगीतले व परत त्यांना वयक्तिक सांगू असे आश्वासन दिले.
विजय परचाके सर
ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर राजुरा