भाऊ सेवा केंद्राद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत नकोडा येथील १५० महिलांचे अर्ज ऑनलाईन

0
76

भाऊ सेवा केंद्राद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत नकोडा येथील १५० महिलांचे अर्ज ऑनलाईन

मुख्यमंत्री वयोश्री योजनेत ६२ पुरुषांचा व महिलांचा सहभाग

महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांच्या सहकार्याने महिलांना योजनेचा लाभ

नकोडा : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात केलेल्या घोषणेनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची सेवा केंद्रात गर्दी ओसंडू लागली तर काही प्रमाणात अंगणवाडी सेविका तसेच वैयक्तिक फॉर्म नोंदणी करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची तडमड सुरू असताना दिसते आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील बहिणी व मातांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांनी पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात गंज वार्ड चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात व नकोडा येथे भाऊ सेवा केंद्राच्या माध्यमातून महिलांना मोफत ऑनलाईन फॉर्म भरून देण्याचे कार्य सुरू आहे. यातून भाऊ सेवा केंद्र नकोडा द्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत १५० महिलांचा आणि मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे ६२ फॉर्म भरून या योजनेत समाविष्ट करण्यात आले. याकरिता ग्राम पंचायत नकोडा येथील सरपंच श्री किरन बांदुरकर माजी सरपंच श्री.ऋषी कोवे, उपसरपंच मंगेश राजगडकर, सदस्य रजत तुरानकर प्रभाकर लिंगमपेल्ली यांनी सहकार्य केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील २१ वर्षांवरील महिला व शासनाने निर्धारीत केलेल्या अटी आणि मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरीता ६५ वर्षांवरील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी घेण्यास पात्र ठरतात तरी या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनी लवकरात लवकर आमच्या सेवा केंद्रास भेट देवून मोफत ऑनलाईन फॉर्म भरून घ्यावा असे आवाहन भाजपा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here