लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट व लाॅयड्स इनफिनाइट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्य वितरण सोहळा

0
87

लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट व लाॅयड्स इनफिनाइट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्य वितरण सोहळा

तीन शाळांतील सातशेहून अधिक विद्यार्थ्यांना मिळाला लाभ

 

दि.१६ जुलै २०२४ मंगळवार रोजी प्रियदर्शिनी कन्या विद्यालय घुग्घुस, न्यू इंग्लिश हायस्कूल पांढरकवडा व इंदिरा गांधी विद्यालय पडोली येथे लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट व लाॅयड्स इनफिनाइट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंनदो शाळा सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शालेय सहभागाला आधार व प्रोत्साहन मिळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये स्कूल बॅग,बारा नोटबुक, एक कंपास, एक आलेख वही, चित्रकला वही असे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शालेय गणवेश वेळेत उपलब्ध झाले नसून ते लवकरच विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. या प्रसंगी प्रमुख अतिथी कु.नम्रपाली गोंडाने (हेड ऑफ सी.एस.आर डिपार्टमेंट लाॅयड्स इनफिनाइट फाऊंडेशन),श्री.आदित्य सिंग (वरिष्ठ व्यवस्थापक, लाॅयड्स मेटल्स), श्री.नितेश गुप्ता (ए.जी.एम.लाॅयड्स मेटल), श्री. मुकेश भोयर (समन्वयक, लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट), श्री. मुत्त्यालवार (केंद्रप्रमुख) हे उपस्थित होते. कार्यक्रमाला त्या त्या शाळांच्या संचालकांसमवेत मुख्याध्यापिका आणि शिक्षकवृंद सहभागी होते. घुग्घुस येथे सौ.अनु खानझोडे (प्राचार्या),पांढरकवडा येथे श्री. वागदरकर (संस्थाचालक), श्री. नायर (संस्थाचालक), डॉ. अपर्णा शुक्ला (प्राचार्या), पडोली येथे. श्री. व सौ. गोहोकार (संस्थाचालक), सौ. कुंदा चवले (मुख्याध्यापिका) यांनी उपस्थिती दर्शविली. तिन्ही शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर पालक वर्गानी सहभाग दर्शविला. तिन्ही शाळांत
कार्यक्रमाचे उद्देश्य आणि संस्थेअंतर्गत गतवार्षातील उपक्रम यांचा आढावा आणि चालू वर्षातील नियोजित उपक्रमांची माहिती श्री. मुकेश भोयर यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केली.
प्रमुख अतिथी नम्रपाली गोंडाने यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना व शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच मागील वर्षाप्रमाणे यावर्षी मान्य केलेल्या भौतिक सुविधा सुद्धा जाहीर केल्या. सर्व शाळाच्या मुख्यद्यापिकांनी आनंदो शाळा सक्षमीकरण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये होत चाललेल्या प्रगतीचा आढावा मांडला व लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट बदद्ल कृतज्ञता व्यक्त केली.
शाळांच्या संस्था चालकांनी आपल्या मनोगतात संस्थेचे तोंड भरून कौतुक करत कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या सहा. समन्वयक रश्मी होले, साक्षी काळे, प्रज्ञा पवार, सुमैय्या मिर्झा, मिलिंद काटकर, यांच्या समवेत सर्व शालेय शिक्षकांनी कठीण परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here