सैनिकाची गावात वाजत गाजत रॅलीद्वारे आगळीवेगळी मिरवणूक काढून केला सत्कार
राजु झाडे
जिवती । तालुक्यातील नंदप्पा येथील प्रवीण गंगाधर पोले तरुणाची भारतीय सैनिकात नुकतीच निवड झाली. हा आनंदाचा क्षण गावातील मंडळींनी सदर सैनिकाची वाजत गाजत आगळीवेगळी मिरवणूक काढली.
यावेळी सरपंच, तंटामुक्त समिती अध्यक्ष, जिप शाळेचे मुख्याध्यापक, पोलीस कर्मचार्यांसह समस्त नंदप्पा गावकरी उपस्थित होते. यावेळी सभोवतालच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
प्रवीण पोले या सैनिक युवकाची आगळीवेगळी मिरवणूक काढून त्यांचा गावकऱ्यांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला. यामुळे गावातील इतर तरुणांनाही याचा आदर्श निर्माण झाला आहे.