महसूल कर्मचारी बेमुदत संपावर! जनतेची कामे खोळंबली!
चंद्रपूर जिल्ह्यातील 570 महसूल कर्मचा-यांसह कोतवाल बांधव उतरले बेमुदत संपात
चंद्रपूर – विशेष प्रतिनिधी :- शासनाने महसूल कर्मचारी संघटनेच्या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे नाईलाजाने चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडों महसूल कर्मचा-यांना आज सोमवार दि.15 जूलै पासून बेमुदत संपाचे हत्यार उपसावे लागले.दरम्यान सुरू झालेल्या या बेमुदत संपात जिल्ह्यातील संपूर्ण कोतवाल बांधव सहभागी झाल्याची माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे शैलेश धात्रक, नितिन पाटील व अजय मॅकलवार यांनी आज या प्रतिनिधीस एका भेटी दरम्यान दिली.
सदरहू बेमुदत संप होण्यापूर्वी प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्याभरातील महसूल कर्मचारी बांधवांनी शुक्रवारी लेखनी बंद आंदोलन केले होते.
परंतु शासनाने अद्याप आमच्या रास्त मागण्यांची दखल न घेतल्यामुळे आम्हाला नाईलाजाने बेमुदत संप पुकारावा लागला असे महसूल कर्मचारी संघटनेचे दीपक वडूळे व अमोल आखाडे यांनी सांगितले.
या बेमुदत संपामुळे साहजिकच शासनाच्या महत्वाच्या कामांवर विपरीत परिणाम झाला असून चंद्रपूर जिल्ह्याच्या महसूल विभागाीलअनेक पदे आजही रिक्त आहेत.