आकाश गेडाम यांची पदवीधर शिक्षक पदी नियुक्ती

0
174

आकाश गेडाम यांची पदवीधर शिक्षक पदी नियुक्ती
श्री. ब्रिजभूषन पाझारे यांच्या हस्ते गेडाम कुटुंबीयांचा सत्कार
नकोडा :- चंद्रपूर तालुक्यातील नकोडा येथील आकाश छगन गेडाम यांची परभणी जिल्ह्यातील बामणी येथे गणित व विज्ञान विषयाकरिता नियुक्ती झाल्याबद्दल भाजपा महामंत्री श्री. ब्रिजभूषन पाझारे यांनी आकाश गेडाम यांच्यासह आई वडिलांचा सत्कार केले.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण करून लक्ष गाठले. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण नाकोडा येथील जिल्हा परिषद शाळेतून तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण राजुरा येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात राहून शिवाजी विद्यालय राजुरा येथून पूर्ण केले. व महाविद्यालयीन शिक्षण चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयातून पूर्ण केले. वडील खाजगी पद्धतीने नकोडा येथील कंपनीत कामाला असून आई गृहिणी आहे. अनुसूचित जमाती मधील अत्यंत गरीब कुटुंबातील हा मुलगा स्वतःच्या मेहनतीने उच्च शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता त्याने २०२२ मधील शिक्षक अभियोग्यता चाचणी यशस्वीरित्या पास झाला शासनाने या परीक्षेच्या आधारावर काढलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत त्याचा परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बामणी या गावी गणित, विज्ञान विषया करिता पदवीधर शिक्षक म्हणून नियक्ती झाली. त्याच्या या श्रेयाबद्दल भाजपा महामंत्री श्री. ब्रिजभूषन पाझारे यांनी आकाश गेडाम आणि त्यांच्या आई वडिलांचा सत्कार केले व पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा महामंत्री श्री. ब्रिजभूषन पाझारे, गावाचे सरपंच श्री. किरण बांदुरकर, माजी सरपंच श्री. ऋषी कोवे, माजी उपसरपंच श्री. चंदर ताला, उपसरपंच श्री. मंगेश राजगडकर, भाजपा शहर अध्यक्ष श्री. बाळकृष्ण झाडे, ग्राम पंचायत सदस्य श्री. रजत तुरणकर, तसेच गावातील प्रतीष्ठित नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here