साहेब…! ही गरिबांची मुलं आहेत.. गुरढोर नाहीत..! किमान शैक्षणिक सुविधा द्या
चंद्रपूर :- गरिबांची मुलं शिकायलाच नको असं धोरण राज्य सरकारचे आहे काय, असा प्रश्न मनात निर्माण व्हावा. इतकी विदारक स्थिती ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेची झालेली आहे. जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला… या निर्णयाविरोधात राज्यभरात संताप व्यक्त केला गेला… त्यामुळेच की काय जिल्हा परिषदेच्या शाळांकडे स्थानिक प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे…बघा… गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथील ही शाळा… कुठल्याही क्षणी कोसळेल इतकी जीर्ण झालेली इमारत… शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही… शौचालय नाही…
अशी ही शाळा आपल्या देशाचं उद्याचं भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना घडवित आहे… शाळेची ही अवस्था बघता येथील मुख्याध्यापकांनी वारंवार जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला… मात्र डोळ्याने आंधळे आणि कानाने बहिरे असलेल्या प्रशासनाला या शाळेची वेशीवर टांगलेली लक्तरे दिसलीच नाही… असं इथलं ढिम्म प्रशासन…. चिमुकल्या विद्यार्थ्यांना साध्या सुविधा देऊ न शकणाऱ्या जिल्हात विकास पुरुष राहतात म्हणे….हीचं मोठी शोकांतिका आहे, असा घणाघाती टोला यावेळी सामाजिक कार्यकर्ते भूषण फूसे यांनी लगावला आहे.