मुसळधार पावसामुळे नगर परिषद राजुरा येथील नाली सफाई कामाची झाली पोल खोल

0
161

मुसळधार पावसामुळे नगर परिषद राजुरा येथील नाली सफाई कामाची झाली पोल खोल

स्वच्छतेचे निघाले वाभाडे, यावर मुख्याधिकारी काय उपाययोजना करणार?

राजुरा, ९ जुलै :- आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे राजुरा शहरात ठिकठिकाणी कृत्रिम जलतरण तलाव निर्माण झाल्याचे बोलके चित्र शहरवासीयांना अनुभवयास मिळाले. वेळेवर नाली सफाई न केल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील नालीसफाई पावसाळ्या पूर्वी करणे नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी होती पण त्यांच्या या निष्क्रियतेने जनतेला भोगावं लागतय.

नागरिकांनी वारंवार वॉर्डच्या व्हॉटसअप गृपवर या बाबत अनेकदा तक्रारी केल्या पण सध्या प्रशासकीय अधिकारी यांच्या ताब्यात असलेल्या नगर परिषद यंत्रणेकडे कोणतेच लोक प्रतिनिधी व माजी नगरसेवक लक्ष देत नसल्यामुळे जनता हवालदिल झाली आहे. जबाबदारीने कर भरणा करून सुद्धा प्रशासना कडून स्वच्छता व जनतेच्या आरोग्याबाबत उदासीन धोरण असल्यामुळे आरोग्याचं काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने राजुरा शहरातील चुनाभट्टी वार्ड जलमय झाला असून संपूर्ण रस्ते पाण्याखाली गेले. विद्यार्थ्यांना पाण्यातून मार्ग काढत घरी जावे लागत आहे. जुने एसडीपीओ ऑफिस जवळील अमराई वार्ड, नाका नं. ३ वर जवळपास दुकानामध्ये नाली चे पाणी घुसत आहे. यावर प्रशासन काही उत्तर देतील का किंवा ही परिस्थिती पाहून त्यांना जाग येणार का..? पावसाळा सुरू होवून सुद्धा नालेसफाई झाली नाही यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्याने रस्ते पाण्याने भरले जात आहेत. परिणामी पाणी ओसरे पर्यंत शहरात पूरपरिस्थिती अनुभवयाला येत आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम पुरस्कार प्राप्त नगर परिषदचे असे हाल बेहाल दिसून येत असून यावर मुख्याधिकारी काय उपाययोजना करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

“मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव यांना याबाबत विचारणा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कॉल रिसिव्ह केला नाही.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here