दगडफेकित ट्रॅक्टर श्रमिकाचा दुर्दैवी मृत्यु

0
175

दगडफेकित ट्रॅक्टर श्रमिकाचा दुर्दैवी मृत्यु

राजुरा, ४ जुलै :- तालुक्याला लागलेले म्हणा की ग्रासलेले ग्रहण म्हणजे अवैध व्यवसाय. केव्हा अवैध व्यवसायामुळे कोणाचा जीव जाईल याचे काहीच सोयर सुतक समजण्याचे विकल्पच उरले नाही. पैसै कमावण्याच्या धुंदीत मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. अवैध व्यवसायावर लगाम लावण्यात प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरताना दिसून येत आहे.

अशीच घटना काल रात्री ११.३० वाजता दरम्यान धोपटाळा जवळ घडली. धोपटाळा येथील काही युवक मद्य सेवन करून येणाऱ्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची वाट रोखून धरतात व त्यांच्या कडून ५० हजार रूपये खंडणीची मागणी करतात. अशातच ट्रॅक्टर मालक ती मागणी फेटाळतो व त्यानंतर तो युवकांचा घोळका त्या ट्रॅक्टर वर चढून जातो. त्यांच्याच शाब्दिक चकमक उडते आणि हातापायी होते.

अशातच एक जण ट्रॅक्टरची चाबी काढून घेतो व ट्रॅक्टर मालक आपल्या वडिलांना बोलावून ट्रॅक्टर डायरेक्ट करून राजूऱ्याच्या दिशेने ट्रॅक्टर पळवितो. परंतु अचानक तोच युवकाचा घोळका धोपटाळा कॉलनी चे एटीएम समोर येऊन बांबू व दगड घेऊन त्या ट्रॅक्टर वर दगड फेक करतात. त्या दगडफेकी मध्ये सोनिया नगर वॉर्ड राजुरा येतील रहिवासी असलेल्या मोहम्मद शाहनवाज खान पठाण (४२) नावाच्या होतकरू श्रमिकाच्या छातीला दगड लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू होतो. सदर घटना मन हेलावणारी असून पोलीस विभागाकडून हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी घोळक्यातील पाच ते सहा जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

महसूल विभाग व पोलीस प्रशासन अवैध व्यवसायावर आळा घालण्यात सपशेल अपयशी
सध्या संपूर्ण तालुक्यात कमी कालावधीत जास्त पैसा कमविण्याचा व्यवसाय म्हणून मातब्बर तस्करांसमवेत स्थानिक नवखे ट्रॅक्टर मालक ही रेती तस्करीच्या व्यवसायात गुंतले आहेत. रोज शेकडो ब्रास रेतीची चोरी होत असून सुद्धा महसूल विभाग मूग गिळून गप्प बसल्याने महसूल विभागातील स्थानिक कर्माचाऱ्यापसून तालुका महसूल अधिकाऱ्याचे तस्करांसोबत आर्थिक सतेलोट्यामुळे मधुर नाळ जोडली गेली आहे. यामुळे कारवाई होताना दिसून येत नाही, असा सामान्य जनतेतून सुर उमटत आहे. परिणामी तालुक्यात अवैध व्यवसाय गुन्हेगारीला खतपाणी घालत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here