लोकहितचे कार्य उल्लेखनीय व कौतुकास्पद – नलिनी आडपवार
राष्ट्रीय लोकहित सेवा कार्यालयाचे थाटात उद्घाटन संपन्न
नवनियुक्त पदाधिका-यांना दत्तात्रय समर्थ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र बहाल
कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक पुंडलिक गोठे, श्रूति शेंडे, समता बन्सोड, कवयित्री शैला चिमड्यालवार मारोतराव शेरकेंची प्रामुख्याने उपस्थिती!
मूल (चंद्रपूर) विशेष प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांतील राष्ट्रीय लोकहित सेवाचे कार्य अतिशय उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे मत महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या सहसंयोजिका नलिनी आडपवार यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगरीत काल रविवारी दुपारी मुख्य मार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या लोकहित कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. याच कार्यक्रमात आपल्या प्रास्ताविक भाषणातून महसूल विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी दिलीप गेडाम यांनी लोकहितने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारी ही संघटना असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणातून या वेळी केला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महिला सामाजिक कार्यकर्त्या अर्चना समर्थ यांनी विभूषित केले होते. याच उद्घाटन कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकारी चंद्रपूरच्या समाजसेविका अंजली देवेंद्र इटनकर, कविता दिकोंडवार व लता विजय बारापत्रे यांना राष्ट्रीय लोकहित सेवाचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांचे हस्ते मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र बहाल करण्यात आले. कार्यक्रमाला पडोलीचे जेष्ठ नागरिक पुंडलिक गोठे, भद्रावती तालुक्यातील बोरगांव धांडे येथील वयोवृद्ध नागरिक चंद्रभान चौधरी, संजय चिटमलवार , डॉ. आंनदराव कुडे, राष्ट्रीय लोकहित सेवाचे मूल तालुका अध्यक्ष मारोतराव शेरकी, निशा धोबे, प्रमोद गेडाम, विकास गेडाम, वैशाली विकास गेडाम, सहज सुचलं काव्यकुंज सावलीच्या सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार, सहज सुचलं नवोदित सदस्य श्रूति शेंडे, समता बन्सोड, प्रशांत बन्सोड, उषा निमगडे, पुष्पा प्रभाकर चिताडे, राजेंद्र शेंडे , जान्हवी समर्थ, रुद्रा समर्थ या शिवाय राष्ट्रीय लोकहित सेवाचे पदाधिकारी, सहज सुचलं व किरणदिप व्हाॅट्सअप गृपचे पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दिलीप गेडाम यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रृती शेंडे यांनी मानले.