कोळसा भरलेल्या ट्रकची एसीसी रेल्वे गेटच्या अँगलला जोरदार धडक…

0
301

कोळसा भरलेल्या ट्रकची एसीसी रेल्वे गेटच्या अँगलला जोरदार धडक…

घुग्घुस :- येथील दि. २९ जुन २०२४ शनिवार रोज सकाळी ८ वाजता दरम्यान मुंगोली कोळसा खदान मधुन जे.एस.एम.टी. ट्रान्सपोर्ट कंपनीच्या १८ चक्का ट्रक क्रमांक एम.एच.३४ बी.झेड २१४९ हे वाहन कोळसा भरुन चारगाव चौकी मार्गाने घुग्घुस रेल्वे सायंडींगवर खाली करण्याच्या जागी चुकीने घुग्घुस एसीसी रेल्वेगेट पोलीस स्टेशन जवळ रेल्वेगेटच्या अँगलला जोरदार धडक दिली. ट्रकच्या समोरील भाग चेंदामेदा होऊन लाखो रुपयाचे नुकसान झाले. ट्रक चालक जखमी झाला असुन परिसरातील ये-जा करणाऱ्या नागरिकाला त्रास सहन करावा लागला. सुदैवाने जीवहानी टळली. ट्रक चालक मद्यप्राशन करून असल्याचे बोलण्यात येत आहे. पोलीसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here