स्वस्त धान्य दुकानदारांचे विविध मागण्यांसाठी राजुरा येथे धरणे आंदोलन…
विरूर स्टेशन/अविनाश रामटेके
राज्यातील सर्व शिधावाटप रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित न्याय मागण्या, धान्य वितरणामध्ये दैनंदिन अडचणीची सोडवणुक करण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची शासनाने पुर्तता करावी, यासह अनेक मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या स्थानिक राजुरा शाखेच्या वतीने राजुरा तहसिल कार्यालयापुढे धरणे देण्यात आले. यावेळी राजुरा तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व राजुरा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष विठल पाल, सचिव मंगेश गुरनुले, बाळू भावे, अनिल नगराळे, शांताराम बोबाटे, वसंत मोरे, राजाराम येल्ला, गणपत हंसकर, शालिक तुराणकर, राधेश्याम जोशी, राज पाटील, वसंत बारसागडे, नितीन भोंगळे, सुरज पंधरे, भगवान रामटेके, प्रशिक आगलावे, गणेश तिवारी, प्रकाश आत्राम, बंडू वाघमारे, जैराम फड, वसीम शेख, बंडू कन्नाके, विलास किनाके, दिवाकर गेडाम, डाहुले यांनी केले.
यावेळी माहिती देतांना संघटनेचे सचिव मंगेश गुरनुले यांनी सांगितले की, संघटनेने राज्य स्तरावर वेळोवेळी निवेदन देऊन रास्त मागण्या पुर्ण करण्याची मागणी करण्यात आली. मात्र राज्य स्तरावरुन कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री महोदयांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय संघटनेच्या पदधिका-यांसोबत बैठक झाली. यावेळी राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या तसेच मार्जिन मध्ये 50 रुपये इतकी वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती, मात्र अद्याप अंमलबजावणी झाली नाही. आता सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रश्नावर आणि प्रलंबित मागण्यावर राज्य शासनाने तातडीने प्रश्न सोडवावे, यासाठी त्रिस्तरीय आंदोलन होणार आहे. याचा पहिला भाग म्हणुन दिनांक 27 जुन 2024 रोजी धरणे आंदोलन करण्यात आल्याचे मंगेश गुरनुले यांनी सागितले.