आदिवासी टायगर सेना महावितरण कंपनीच्या कामगाराच्या पाठीशी…
पोलिस स्टेशन घुग्घुस गाठून घेतली प्रकरणाची माहिती
घुग्घुस येथील महावितरण कंपनीच्या च्या कर्मचारी सूरज परचाके ह्यांना कर्तव्यावर असताना नकोडा येथील सरपंच ह्यांनी सूरज परचाके ह्याला भर चौकात खांबाला बांधून मारहाण केल्याची बातमी माहिती होताच आदिवासी टायगर सेना चे पदाधिकारी थेट पोलिस स्टेशन गाठून झालेल्या प्रकरणाची चौकशी व गुन्हे दाखल करायला उशीर का लागला याविषयी माहिती घेतली. पोलीस स्टेशन घुग्घुस चे ठाणेदार सोनटक्के सदर घटनेविषयी निवेदन देण्यात आले.
सदर प्रकरणात आदिवासी टायगर सेना ही महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पाठीशी उभी राहील असे मत ऍड. संतोष कुळमेथे विदर्भ अध्यक्ष, ऍड. जितेश कुळमेथे विदर्भ महासचिव, प्रा. हितेश मडावी जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, ड्रेफुल आत्राम जिल्हा उपाध्यक्ष, दिनेश परतेती तालुका अध्यक्ष चंद्रपूर, रंजीत मडावी जिल्हा युवा अध्यक्ष, विराज सुरपाम जिल्हा युवा महासचिव, शेखर मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष युवा, बाळु कुळमेथे जिल्हा सदस्य तसेच घुग्घुस, नकोडा, गावातील आदिवासी समाज बांधव गणेश किन्नाके, दीपक पेंदोर, मनोज चांदेकर, बाल किशन कुळसंगे, कुणाल टेकाम, कुणाल टेकाम, देविदास किवे, रोशन पेदोर, गणपत गेडाम, अरविद किवे, मनीष आत्राम, प्रवीण उईके, अंकुश उईके, लतिश आत्राम, विठ्ठल कुमरे, सुनील जुमनाके, बादल कोडापे, रितिक कुमरे, संगम गेडाम, शिवम टेकाम, शिवम उईके, अजय आत्राम, स्वप्नील गेडाम, अभिषेक मडावी, संदीप तोडासे, समाज सेवक सह शेकडो कार्यकर्ते आदींनी पोलीस स्टेशन व पिडीत कर्मचाऱ्याला भेट दिली.