तालूका कृषी अधिकारी प्रशांत कसराळेंवर तातडीने कारवाई करा ! राष्ट्रीय लोकहित सेवाची मागणी

0
314

तालूका कृषी अधिकारी प्रशांत कसराळेंवर तातडीने कारवाई करा ! राष्ट्रीय लोकहित सेवाची मागणी
दत्तात्रय समर्थंचे वरिष्ठांकडे निवेदन सादर


मूल – प्रतिनिधी – मूल पोलिस स्टेशनला तक्रार दाखल झालेल्या तालूका कृषी अधिकारी प्रशांत गोविंदा कसराळेंवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अश्या आशयाची मागणी राष्ट्रीय लोकहित सेवाच्या वतीने शुक्रवार दि.१४ जूनला मूलच्या तहसिलदार तथा तालूका दंडाधिकारी मृदूला मोरे यांच्याकडे करण्यात आली.तदवतंच आज एका शिष्टमंडळाने त्यांना या बाबतीत एक लेखी निवेदन सादर केले.
निवेदन सादर करताना राष्ट्रीय लोकहित सेवाचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ, औद्योगिक सेलच्या जिल्हा शहर सचिव समता बन्सोड, महिला कार्यकर्त्या सविता मारटकर, विक्रम गुरनूले, सचिन गुरनूले,विकास गेडाम, नरेंद्र वाळके, राकेश बुरीवार ,ओमदेव मोहूर्ले,माजी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे या शिवाय राष्ट्रीय लोकहित सेवाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्तेगण उपस्थित होते.काल याच कृषी अधिका-याच्या बाबतीत चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दत्तात्रय समर्थ यांच्या नेतृत्वाखाली एक लेखी निवेदन सादर करण्यात आले होते.या वेळी कविता दिकोडवार,अर्चना ठाकरे पुंडलिक गोठे व अन्य सदस्यगण उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते ओमदेव मोहूर्ले यांनी उपरोक्त प्रकरणात तातडीने चौकशी करून या अधिका-यास निलंबित करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here