धोबी समाजाच्या मागणीनुसार शासन निर्णय काढायला भाग पाडू : आमदार सुभाष धोटे
राजुरा (ता.प्र.) :– शासनाच्या इतर मागास प्रवर्ग यादीमध्ये एकच व्यवसाय करणा-या व आप-आपसात रोटी, बेटी व्यवहार करणा-या धोबी परिट जातीचा अनुक्रमांक १२५ व वरठी, वठी जातीचा अनु.क. १६६ अशा दोन वेगवेगळ्या क्रमांकावर उल्लेख करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या जातपडताळणी विभागाकडून धोबी, परिट, वरठी, तेलगु मडेलवार हया एकच जाती वेगवेगळ्या कमकांवर असल्यामुळे समाजातील मुलांना जात पडताळणी प्रमाणपत्र (Cast Validity Certificate) मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या अनुषंगाने समाजाने महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग पुणे यांचेकडे वेळोवेळी पाटपुरावा करुन तसेच योग्य ते दस्तावेज दाखल करुन धोबी, परिट व वरठी या जाती एकच असल्याचे कागदोपत्री पुरावे देवून पटवून दिलेले आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग पुणे यांनी धोबी, परिट व वरठी, तेलगु मडेलवार हया जाती एकच असल्यामुळे शासनाच्या इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या यादीत अनु. १२५ व १६६ नंबर वरुन एकाच क्रमांकावर घेण्याबाबतचा अहवाल महाराष्ट्र शासनास सादर केलेला आहे. परंतु महाराष्ट्र शासनाकडून आजपावेतो त्याबाबतचा शासन निर्णय पारीत करण्यात आलेला नाही. त्यामुळे समाजातील गोरगरीब व होतकरु मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा धोबी समाजाने आ. सुभाष धोटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेल्या मागणीनुसार येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून शासन निर्णय काढायला भाग पाडु असे आश्वासन आ. धोटे यांनी धोबी समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा धोबी समाजाचे अध्यक्ष बंडू रोहनकर, सचिव अशोक तुराणकर, सदस्य उध्दव नांदेकर, राजकूमार चिंचोलकर, सौरभ मादसवार, रमेश भेसूरवार, संगिता तुराणकर, सविता भेसूरवार, जयश्री पवनकर यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.