गुलाबी बोंडअळीचे केंद्र व राज्य सरकारने सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत घ्या- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे.

0
523

अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी

गुलाबी बोंडअळीचे केंद्र व राज्य सरकारने सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत घ्या- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे.

माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी कपाशीच्या पिकांची केली पहाणी.

हिंगणघाट:-
कपासीच्या पिकावर आलेल्या गुलाबी बोंडअळीचे केंद्र व राज्य सरकारने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दादाजी भुसे यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
विदर्भातील खूप मोठ्या प्रमाणात कापसाचा पेरा असून विक्रमी उत्पादन घेतल्या जाते. चालू हंगामात कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडअळीने थैमान घातले असून प्रत्येक बोंड़ात आळीचे प्रमाण आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करीत आहे.
दसरा, दिवाळी सणाला लागणारा खर्च व रब्बीची पेरणी खरीपातील कापूस, सोयाबीन पिकावर अवलंबून असते. सोयाबीनचे पिकावर खोडकिडा व बरशीच्या प्रादुर्भावाने निस्तेनाभूत झाले असून शेतकऱ्यांनी गुरे-ढोरे चारली. तर काहींनी रोटावेटर मारून रब्बीच्या पिकासाठी शेत तयार केले. अशातच आता कापसाच्या पिकावर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे खरिपाच्या हंगामात संकटात सापडलेला शेतकरी रब्बीच्या हंगामात लागवड कशी करावी यामुळे धास्तावलेला आहे.
सध्याच्या परिस्थितीत कापूस वेचणीला सुरुवात झाली असून दिवाळीच्या अगोदर पांढरे सोने शेतकऱ्यांच्या घरी येणार आहे. पण अचानक गुलाबी बोंडअळीने शिरकाव केल्याने शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. अशातच समोर असलेल्या रब्बीच्या पेरणीचा खर्च कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला असून शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडला आहे.
तरी केंद्र व राज्य सरकारने त्वरित कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील सर्वे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषीमंत्री दादा भुसे यांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here