सीएमपीएल कंपनीच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरूच… आंदोलनकर्त्याचा आत्मदहनाचा इशारा

0
209

सीएमपीएल कंपनीच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरूच… आंदोलनकर्त्याचा आत्मदहनाचा इशारा

 

सी. एम.पी. एल. माती उत्खनन या कंपनीतील कार्यरत स्थानिक कामगारांना कंपनीचे काम संपल्याचे सर्व कामगारांना पत्र पाठवून कामावरून डावलण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे. कारण सदर कंपनीचे दुसरे काम हे राजुरा विधानसभा क्षेत्र सास्ती इथे सुरु आहे.

कंपनीने स्थानिक कामगारांना कामावरून कमी केल्यास त्यांच्यावर तसेच त्याच्या परिवारावर उपासमारीची वेळ येणार.स्थानिक कामगारांना कामावरून न काढता सास्ती येथे स्थलांतर करण्यात यावे.

याकरिता अनैशा वाहन चालक कामगार संघटना चे संस्थापक अध्यक्ष सुरज भाऊ उपरे तसेच सामजिक कार्यकर्ते भूषणभाऊ फुसे यांच्या नेतृत्वात राजुरा तहसील कार्यालयासमोर दिनांक 10 जून 2024 रोज सोमवार ला बहुजनांच्या महापुरुषांना अभिवादन करून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आले.

बेमुदत धरणे आंदोलनात आंदोलनकर्ते आकाश ताकसांडे, ऋषी चौधरी, अजय इग्रपवार, साई कुमार मोगलीवार, राकेश चेनमेंवार, श्रीकांत जलावार, पांडुरंग मंगाम, आशिष पझारे,या वेळेस माणिक संजीव, दशरथ कोंडावार,मिथुन कांबळे,राहुल राठोड,विशाल सल्लम,संकेत भादिकर,शंकर काळे,प्रवीण जेल्लेल,प्रवीण चेनवेंनवार,उपस्थित होते.

आंदोलनाचा पाचवा दिवस
आज दिनांक 14/06/2024 अंद्दोलन सतत चालू असताना सुधा आतापर्यंत शासन प्रशासनाने तसेच सदर कंपनीने कसल्याही प्रकारची दखल न घेतल्या कारणाने आंदोलनकर्ता आकाश तकसांडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here