झरी येथील शेतकऱ्यांचे केसिसी कंपनीवर आरोप चुकीचे
कंपनीचा पत्रकार परिषदेत खुलासा
चिमूर : तालुक्यातील शिवापूर (बंदर) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या झरी(मंगरूळ) येथील शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन कंपनीवर अवैध गौण खनिज उपासा चा आरोप चुकीचा असून गौण खनिज उपसा च्या सर्व परवानग्या संबंधित विभागाकडून रीतसर घेतल्या असल्याची माहिती कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक विजयकुमार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मागील पावसाळ्याच्या काळात संबंधित तलावाची पाळ ही पावसाच्या पाण्याने वाहून गेली होती. तरी सुद्धा कंपनीने जेसीबी नी पाळ तोडल्याची चुकीचा आरोप करून केसिसी कंपनीला बदनाम करण्याचा प्रयत्न काही वाईट प्रवृत्तीच्या लोका कडून होत आहे. तसेच ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच तथा शेतकरी यांचे कडून संबधित तलावाची पाळीची दुरस्तीही करण्याची मागणी केली. त्यानुसार तलावाच्या पाळीची दुरुस्तीही पूर्ण करून देण्यात आली. अशी माहिती दिली.
मागील दोन वर्षापासून चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या मध्ये परिसरातील गावातील सुमारे १०० मजुरांना रोजगार मिळाला असून नियमित कामावर असतात. या मध्ये गावकऱ्यांचे सहकार्य लाभत असून नागरिकांचा मागणी प्रमाणे काम करून देत असल्याची व गावातील अनेक विकास कामांना कंपनी पूर्ण करून देत असून काम प्रगतीपथावर आहे. मात्र, काही वाईट प्रवृत्तिकडून कंपनीला बदनाम करण्यासाठी अशा आशयाचे चुकीचे आरोप प्रसार माध्यमातून होत आहेत; ही बाब चुकीची असून या सर्व गोष्टीची पूर्व परवानगी संबंधित शासकीय कार्यालयाकडून कंपनीला असल्याची माहिती कंपनीच्या व्यवस्थापनाने दिली.
————————-
मामा तलावाची फुटलेली पार दुरुस्त
शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, शेतकऱ्यांचे हित जोपासत संबधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झरी येथील मामा तलावाची पार दुरुस्त केली असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने सांगितले.