विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

0
540

विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

तालुका प्रतिनिधी
चिमूर.

तालुक्यातील बंदर(शिवापूर) ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट असलेल्या डब्लू. सी.एल. वसाहतील रहिवाशी असलेल्या मंथन रमेश आत्राम( वय २४ वर्ष ) या युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे.
डब्ल्यू. सी.एल. वसाहतीतिल दुर्गा देवीच्या विसर्जनासाठी खडसंगी- मुरपार मार्गावरील खोडदा नदीच्या नाल्यावरील बंधाऱ्यावर विसर्जन करीत असताना पाण्याचा अंत न लागल्याने हा युवक बुडत होता. हि बाब इतरांच्या लक्षात येताच त्यांनी युवकाच्या बचावासाठी पाण्यात उतरले व त्याला पाण्यातून बाहेर काढले व खडसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.सदर घटनेचा माहिती मिळताच चिमूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवाची उत्तरीय तपासणी करून नातेवाईंकांच्या स्वाधित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here