स्वस्त धान्य दुकानदारांना 4 जि पॉस मशिनचे वाटप
अविनाश रामटेके
विरूर स्टेशन
धाण्याचा काळाबाजार वर अंकुश लावण्याकरिता व धान्य वाटपात पारदर्शीकिता आणण्याकरिता राज्यात मागील काही काळा पासून पॉस मशीन वर बायोमेट्रिक पद्धतीने सरकारी वितरण प्रणाली अंतर्गत गरजूना धान्य वाटप सूरू आहे त्यात राजुरा तालुक्यातील 108 दुकानदारांना मागील पाच वर्षापासुन धान्य वाटप करण्यासाठी 2 G पाॅस मशिन दिल्या होत्या आता त्या मशिनला अनेक समस्या येत असुन त्यामुळे दुकानदारांना वाटप करण्यासाठी खुप त्रासा ला समोरे जावे लागत होते. वेळोवेळी सर्वर डाऊन, लाभार्थी चे अंगुठे नं येणे व कव्हरेज ची अडचण अशा अनेक समस्यामुळे दुकानदार व लाभार्थी हतबल होत होते ही समस्या लक्षात घेता आता शासनाने 4G मशिनचे वाटप करण्याचे ठरविल्या. मुळे त्याअनुषंगाने राजुरा तालुक्यात मा गौड साहेब तहसीलदार राजुरा यांच्या मार्गदर्शन खाली सौं गंभीरे म्यॅडम निरीक्षण अधिकारी राजुरा, श्री वाकडे तालुका पुरवठा अधिकारी राजुरा व श्री कांबळे तालुका पुरवठा अधिकारी राजुरा यांच्या उपस्थित ईंटेग्रा मायक्रो सिस्टमचे जिल्हा समन्वयक श्री.मनोज सेंगर व तालुका टेक्नेशियन नितीन भोंगळे यांनी राजुरा तालुक्यातील 108 स्वस्त धान्य दुकानदारना 4 जि पॉस मशीनचे वाटप करताना आले त्यामुळे सरकारी स्वस्त धान्य दुकानदारात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे