जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चांदा सिमेंट वर्क्स द्वारा वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन
हवामान बदल, जंगलतोड, जैवविविधतेचा ऱ्हास, वाढते तापमान आणि प्रदूषण असलेली चिंताजनक परिस्थिती याची दखल घेता ५ जून २०२४ बुधवार रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अदानी कौशल्य विकास केंद्र, एसीसी चांदा सिमेंट वर्क्स, सिमेंट नगर येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान विविध प्रजातींच्या फळझाडांची लागवड करण्यात आली.
प्लॅन मेंटेनन्स हेड राजमल शर्मा, प्लांट एनर्जी आणि पर्यावरण हेड देवा प्रतिम भद्रा, प्लांट एच.आर. हेड प्रफुल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये चांदा सिमेंट वर्क्स च्या सर्व अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग यांनी वृक्षारोपण केले. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये अदानी फाउंडेशन टीमने (कुमारी वैशाली गुळघाणे प्रोजेक्ट ऑफिसर, सीएसआर, सौ. शुभांगी नगराळे, केंद्रप्रभारी, ASDC व गणेश डोरलीकर स्वयंसेवक) महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
दरम्यान यावर्षी जागतिक पर्यावरण दिन २०२४ चा विषय आहे, ‘आमची जमीन, आमचे भविष्य’, या अंतर्गत जमीन पुनरसंचित करणं, वाळवंटीकरण आणि दुष्काळ या गोष्टींवर भर दिला जाणार आहे. या विषयाला प्राधान्य देऊन अदानी फाउंडेशन, ‘वृक्ष से विकास’ या कार्यक्रमांतर्गत चालू वर्षांमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेतलेला आहे.