मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या वतीने आमगाव येथे जागतिक पर्यावरण दिवस साजरा

0
138

मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या वतीने आमगाव येथे जागतिक पर्यावरण दिवस साजरा

मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या वतीने आमगाव येथे जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. यावेळी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करणे तसेच भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली. पर्यावरण बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विजयी व सहभागी स्पर्धकास बक्षीस वितरण करण्यात आले.

हा कार्यक्रम मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे आणि तालुका समन्वयक योगिता सातपुते व दिनेश कामतवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित डॉ. प्रेषित सुरपाम, उपसरपंच, आशा वर्कर व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मॅजिक बस संस्थेचे युवा मार्गदर्शक सोनाली रणदिवे, गावातील स्वयंसेवक समीक्षा करडे तसेच विद्यार्थी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here