मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या वतीने जागतिक पर्यावरण दिवस साजरा…

0
217

मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या वतीने जागतिक पर्यावरण दिवस साजरा…

मॅजिक बस इंडिया फाउंडेशन (Nestle healthy kids) ‘खेळाद्वारे विकास’ कार्यक्रम चामोर्शी तालुक्यात मुलांच्या विकासासाठी काम करते. मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका अधिकारी दिनेश कामतवार व योगिता सातपुते यांच्या नियंत्रणात चामोर्शी तालुक्यातील तळोधी (मो.) गावात जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचा उद्देश पर्यावरणीय कृतींबद्दल जागरूकता मजबूत करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी एकत्रितपणे आपण शाश्वत सवयी अंगीकारून व संसाधनांचे संरक्षण करून आणि पर्यावरणपूरक पद्धतींना प्रोत्साहन देऊन सुधारू शकतो. पर्यावरण निरोगी राहण्यात आणि पृथ्वीवरील जीवनाच्या अस्तित्वात महत्त्वाची भूमिका बजावते. पृथ्वी ही विविध सजीव प्रजातींचे घर आहे आणि आपण सर्व अन्न, हवा, पाणी आणि इतर गरजांसाठी पर्यावरणावर अवलंबून आहोत. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने आपल्या पर्यावरणाचे रक्षण आणि संरक्षण करणे महत्वाचे आहे. यावेळी या बाबी पटवून देण्यात आल्या.

या कार्यक्रमात मुलांसाठी पर्यावरण विषयावर भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रशमंजुषा, स्वच्छ्ता, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व विजेता व सहभागीना बक्षीस देण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित गावचे सरपंच मनोहर बोदलवार तर प्रमुख पाहुणे डॉ. सुरजगाडे, ग्राप सदस्य विनोद सातपुते, अंगणवाडी सेविका वर्षा गांगरेड्डीवार, CHO दुर्योधन मॅडम, मेश्राम मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील समुदाय युवा नेता व युवा मार्गदर्शक पंकज शंभरकर यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here