दिवसेंदिवस सुर्य आग ओकत आहे…
विशेष प्रतिनिधी/पंकज रामटेके
संपूर्ण देशभरात सुर्य आग ओकत असताना पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. घुग्घुस शहरात तर रेकार्ड ब्रेक झाले आहे. प्रथमच तापमान ५० अंशांवर पोहचले, परंतु गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी उष्णतेची विक्रमी नोंद करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण जगातच सुर्य आग ओकत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या सूर्य चांगलीच आग ओकत आहे. दुपारनंतर घराच्या बाहेर पडणे अशक्य झालेले आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा वाढतच आहे. सकाळी ८ ते सांयकाळी ६:३० वाजेपर्यंत शहरात सूर्यदेवतेचा उष्णतेचा पारा भडकला असून सुर्य आग ओकत असताना दिसुन येत आहे.
दिवसेंदिवस वाढत्या उन्हाचे चटके यामुळे पशुपक्ष्यांच्या तसेच मानवी जीवनावर परिणाम होत आहे. उष्माघाताचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. घुग्घुस शहरात तापमानापासुन नागरिकाची सुटका होईल, अशी कोणतेही चिन्ह दिसून येत नाहीत. उन्हाचे तीव्र चटके जाणवत आहे. दुपारनंतर काम करणे जवळपास अशक्य होत आहे. यामुळे नागरिकांनी दुपारी बाहेर पडणे टाळून शक्य असल्यासच बाहेर पडावे व डोक्यावर टॉवेल किंवा रुमाल बांधून बाहेर पडावे. स्वतःच्या व इतरांचीही काळजी घ्यावी.