लाॅयड्स मेटल्स व लाॅयड्स इन्फिनिट फाउंडेशन तर्फे महिलांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन
लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड घुग्घुस व लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक दायित्व विभागांतर्गत आरोग्य,शैक्षणिक, महिला सक्षमीकरण, सामाजिक जनजागृती यासारखे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. याच माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांची सेवा व्हावी व महिलांना योग्य माहिती मिळावी. यासाठी दिनांक २८ मे ते ३० मे २०२४ ला उसगाव, वढा, शेणगाव,पांढरकवडा व नकोडा या ग्रामीण भागात महिला व किशोरी साठी मासिक पाळी दिवस जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले.होत या कार्यक्रमात महिलांना मासिक पाळीच्या वेळी घ्यावयाची काळजी आणि समाजातील चालू असलेल्या अनिष्ट चाली रीती व त्यांचे दैनंदिन जीवनात होत असलेले दुष्परिणाम याबाबत सौ.ज्योत्सना मेहेकरे यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन च्या सहायक व्यवस्थापक कुमारी नम्रपाली गोंडाणे,मार्गदर्शक म्हणून सौ.ज्योत्सना मेहेकरे तर प्रमुख म्हणून उसगाव ग्राम पंचायत सरपंच निवीता ठाकरे,सौ.पुष्पा मालेकर ग्राम पंचायत कमिटी उपस्थित होती कार्यक्रमाची संपूर्ण माहिती कुमारी नम्रपाली गोंडाणे यांनी दिली.यावेळी गावातील एकूण दोन हजार महिला सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. प्रिया पिंपळकर, सौ.ममता मोरे, सौ. लता बावणे, सौ.मनीषा बरडे, सौ. अश्विनी खोब्रागडे, सौ.मंजुषा वडस्कर यांनी प्रयत्न केले.