उष्णता सहन करुन विजेच्या लपंडावाने घुग्घुसवासी त्रस्त
घुग्घुस शहरातील तसेच परिसरातील गावा-गावातील नागरिकाला उष्णता सहन करावा लागत आहे,त्याच्यावरही रात्रीच्या वेळी विजेच्या लपंडावाने त्रस्त झाले आहेत. महावितरण कंपनीकडून अत्यंत अनियमितपणे भारनियमन करण्यात येत आहेच, शिवाय वारंमवार विजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या त्रासात आणखी भर पडली आहे.वेळेवर वीज बिल न भरल्यास कर्मचारी लगेचच वीज कापण्यास धावतात, मग न सांगता,वेळीअवेळी वीज गायब होते तेव्हा हेच कर्मचारी,अधिकारी कुठे असतात,असा नागरिकांकडून वारंमवार चर्चेत,बोलण्यात येत आहे,एकतर वातावरणात उष्ण वाढला आहे.
अशीही विचारणा केली जात आहे की,एकतर वातावरणात उष्मा वाढला आहे. तापमानाचा पारा चाळिशीच्या वरच आहे,त्यातच वीज गायब झाल्याने तर नागरिक हैराण आहेत.
वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, उन्हाळय़ात विजेचा लोड वाढतो आणि वीज संयंत्रे ट्रिप होतात, परंतु ग्रामस्थांना हे मान्य नाही. घुग्घुस शहरात अंदाजे भागात वीजबिल भरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, तरीही येथे वीजपुरवठा अनियमित असल्याने नागरिक चांगलेच वैतागले आहेत.
गेल्या काही दिवसांत तर सलग रात्री वेळोवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या नागरिकात बोलण्यात येत आहेत. काही भागांत विद्युत वाहिन्यांच्या कमीअधिक दाबामुळे विद्युत उपकरणांचेही नुकसान झाले आहे. मात्र महावितरण कंपनीला या सगळय़ाशी आणि नागरिकांच्या त्रासाशी काहीच देणेघेणे नसल्यासारखाच त्यांचा कारभार सुरू आहे, असे ही नागरिक चर्चा करत आहे.