निराधारांना अनुदान आता ‘डीबीटी’ मार्फत मिळणार…

0
154

निराधारांना अनुदान आता ‘डीबीटी’ मार्फत मिळणार…

३० मे पूर्वी लाभार्थ्यांनी कागदपत्रे तलाठ्यामार्फत तहसील कार्यालयात जमा करावे – ब्रिजभूषण पाझारे

 

चंद्रपूर :- शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन अदा केले जाते. हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधिताच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते. आता मात्र थेट डीबीटी मार्फत निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे.

चंद्रपूर महानगरात पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्या नेतृत्वात संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी श्री. ब्रिजभूषण पाझारे यांची निवड करण्यात आली. या माध्यमातून त्यांनी महानगरात या योजनेकरिता पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकाला योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने प्रत्येक प्रभागात बैठका घेऊन नागरिकांपर्यंत योजनेची माहिती पुरवून पात्र असलेल्या व्यक्तीचे फार्म व कागदपत्रे गोळा करून योजनेचा लाभ मिळवून देण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत आहे. व या योजनेचा लाभ मिळत असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना शासनाच्या बदलत्या नियमाची माहिती नागरिकांना पोहोचवीत आहे.

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्याची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता. तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थीच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रकीयेस विलंब होत होता. त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थींना अनुदानासाठी बँकेत जाने येणे करावे लागत होते. मात्र आता निराधारांचे अनुदान थेट डीबीटी मार्फत मिळणार असल्याने निराधारंची हेळसांड थांबून बँक कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार आहे. त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया चंद्रपूर विभागाकडून सुरु करण्यात आली आहे. याबाबत गावस्तरावर तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधिताना कळविले जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या संजय गांधी लाभार्थी एकूण ६३४८९ असून त्यामध्ये चंद्रपूर महानगर लाभार्थी ५७४७ व चंद्रपूर ग्रामीण लाभार्थी संख्या ३६९३ , नागभीड -५०२३ , ब्रम्हपुरी-५२९२, सिंदेवाही-४१५३, राजुरा-३४७०, मुल-३७८४, गोंडपिपरी-२४०७, वरोरा-कोरपना-४४५२, भद्रावती-३७७६, सावली-३७७७, चिमूर-४९०७, बल्लारपूर-३९३७, पोंभुर्णा-२०६६, जिवती-२०४५ अशी आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थ्याची संख्या श्रावणबाळ लाभार्थी एकूण १०७३९४ असून त्यामध्ये चंद्रपूर महानगर लाभार्थी ३०७४ व चंद्रपूर ग्रामीण लाभार्थी संख्या ७१८९, नागभीड-६९३७, ब्रम्हपुरी-७४४७, सिंदेवाही-७२९२, राजुरा-४८१५, मुल-५६२६, गोंडपिपरी-७०५३, वरोरा-८४२३, कोरपना-८१७०, भद्रावती-९६७२, सावली-१०६५३, चिमूर-९४८९, बल्लारपूर-२९४७, पोंभुर्णा-२८९६, जिवती-५७११ असून सदर लाभार्थ्यांनी ३० मे पर्यंत कागदपत्रे द्यावेत अन्यथा अनुदान अडकणार असे आवाहन करण्यात आले आहे.

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी येत्या ३० मे पर्यंत आधारकार्ड व मोबाईल क्रमांक तलाठी यांच्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मुदतीत आधारकार्ड व मोबाईल क्रमांक न देणारे लाभार्थी अनुदानापासून वंचित राहू शकते. त्यामुळे ते आता डीबीटी मार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात दिले जाणार असून यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँकेचे पासबुक आणि मोबाईल नंबर आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे जाणार आहे.

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्याचे मासिक मानधन आता डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे. तरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील संबधीत योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड व मोबाईल क्रमांक आपल्या गावातील तलाठ्यामार्फत तहसील कार्यालयास उपलब्ध करून द्यावे. असे आवाहन संजय गांधी निराधार योजना चंद्रपूर महानगराचे अध्यक्ष श्री. ब्रिजभुषण पाझारे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here