सोंडो ग्रामपंचायत भगवान भरोसे

0
285

सोंडो ग्रामपंचायत भगवान भरोसे

आझाद फाउंडेशनचा तीव्र आंदोलनाचा इशारा, गावकऱ्यांमध्ये संताप…

मागील एका आठवड्यापासून सोंडो गावात नळ पुरवठा बंद अवस्थेत असून मागील पंधरा दिवसांपासून आरो सुद्धा बंद असल्याने गावातील नागरिकांना मे महिन्यात पिण्याच्या पाण्याची तथा महिलांना कपडे भांडी धुण्याकरिता भर उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येची आझाद फाउंडेशन राजुरा तर्फे दखल घेण्यात आलेली असून मागील एका आठवड्यात चार वेळा या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ सय्यद हे ग्रामपंचायतीला शिष्टमंडळ व गावकऱ्यांसोबत गेले असता ग्रामपंचायत बंद अवस्थेत कुलूप लावून आढळून येते. यामुळे ग्रामसेविका दररोज ग्रामपंचायत मध्ये उपस्थित असतात की नाही हा प्रश्न सुद्धा गावकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

काल दिनांक 10 मे रोजी ग्रामपंचायत येथे निवेदन देण्यासाठी गेले असता सुद्धा ग्रामपंचायत बंद अवस्थेत कुलूप लावून आढळून आली. तसेच ग्रामसेविका निशा कालीवाले यांना आसिफ सय्यद यांनी या गंभीर समस्येवर पाठपुरावा करण्यासाठी व निवेदन देण्यासाठी फोन केला असता त्यांच्याकडून उडवा उडवी चे उत्तर देण्यात येत आले. तसेच आज पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल असे ग्रामसेविकातर्फे आश्वासन देण्यात आले.

आज रोजी जर पाणीपुरवठा सुरू झाला नाही तर आझाद फाउंडेशन राजुरा व गावकऱ्यांतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामसेविका यांना देण्यात आला. यावेळी आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ सय्यद यांच्यासोबत उपाध्यक्ष अक्षय डकरे, सचिव संतोष देरकर, यासोबत ग्रामपंचायतचे माजी सदस्य दादाजी उमरे, श्रीनिवास मिसलवार, सत्यपाल खोब्रागडे, डोमा घोटेकर, धनविजय झाडे, नितेश वडस्कर, अक्षय कालीवार, अमर असुटकर, बाबुराव मेश्राम, संतोष वडसकर, अमर वांढरे, रघुनाथ करमणकर, सिद्धांत उमरे, पत्रुजी गेडाम, व्यंकटेश आयलमेनवार, सुभाष वानखेडे, अरुण कांबळे, आशिष पुणेकर, शंकर मेश्राम, तथा मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here