राज्यस्तरीय अब्याकस स्पर्धेत सिंदेवाही येथील ब्रेनोपीडिया अब्याकस इन्स्टिट्यूट मधील मुलांनी मारली बाजी
सिंदेवाही (चंद्रपूर)
दिनांक 28/04/2024 रविवारी नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अब्याकस स्पर्धेत सिंदेवाही येथील ब्रेनोपीडिया अब्याकस या नावाजलेल्या इन्स्टिट्यूट मधील मुलांनी बाजी मारली.
स्पर्धेत 360 विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यात ब्रेनोपीडिया अब्याकस च्या संचालिका सुश्री स्नेहा गोहणे वाकुलकर ह्यांनी आपले 17 विद्यार्थी उतरवले होते. त्यातून तब्बल 7 चषक आणि 2 प्रोत्साहनपर पदक असे एकूण 9 पारितोषिक मिळवून एकदा पुन्हा आपला ठसा उमटवला.
तब्बल तिसऱ्या वर्षीही बेस्ट franchise अवॉर्ड घेवून शहरात नाव कमावलेले आहे. सदर स्पर्धेत श्रीनिका वाकुलकर, हेशवी झोडे, श्रावस्ती वालदे, अरहान बदनोरे, आर्यन नागापुरे, नंदन गोबाडे, रोमिर वाकडे, स्वरा गुनशेट्टीवर, जिनिषा बोकडे, गार्गी कोलप्याकवार, प्रद्युम्न बोरकर, हिमांशू बोरकर, आरोही कापगते, स्पृहा वाकडे, ओजल कुळसंगे, प्रायंशी पडवेकर, काव्या सम्मनवार या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
प्रोत्साहनपर पदक स्वरा गुनशेट्टीवर आणि प्रद्युम्न बोरकर यांनी पटकाविला. तृतीय पारितोषिक अरहान बदनोरे, काव्या सम्मनवार, श्रावस्ती वालदे यांनी पटकाविला. द्वितीय पारितोषिक रोमिर वाकडे, हिमांशू बोरकर, ओजल कुळसंगे यांनी पटकाविले. तर प्रथम पारितोषिकाचा मानकरी आर्यन नागापुरे हा विद्यार्थी ठरला. सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.