कवडशी येथील पाच वर्षा नंतर भीमजयंती उत्साहात साजरी
घुग्घूस येथुन ७ किलो मीटर अंतरावर असलेले कवडशी गावात मोठ्या जल्लोषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरा करण्यात आली. विशेष म्हणजे या गावात पाच वर्षानंतर भीम जयंती साजरा करण्यात आली. वेगवेगळ्या ठिकाणी ध्वज्जारोहण कार्यक्रम घेण्यत आले कार्यक्रमचे अध्यक्ष भारत साळवे यांच्या हस्ते ध्वज्जारोहण करण्यत आले. आयु. संदीप वासेकर यांनी शालेय विद्यार्थांना नोटबुक, पेन वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बोधिसत्व मैत्री संस्था घुग्घुसचे पदाधिकारी आयु. अमृत सोदारी, बालाजी पतंगे, अमीत मानकर, संदीप वासेकर, कवडशी ग्रापंचायत सदस्या आयु,वंदना भास्कर काकडे ऍड. चंदु भगत हे होते. कार्यक्रमचे अध्यक्ष व प्रमख पाहुणे यांचा हस्ते ध्वज्जारोहण ब अभिवादन करण्यात आले. तसेच गावकरी,नागरिकांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले.
याप्रसंगी मलाबाई भगत, रेशमा वासेकर,रंजना भगत, प्रवीना चामाटे सुलोचना बुच्चे, सविता नगराळे, कांताबाई टेकाम, प्रशांत चिव्हाणे, धनराज तांदुळकर, अतुल मन्ने, कृपाल वासेकर, सूरज भगत, विनायक भगत, बंडू भगत व शालेय विद्यार्थी तसेच शिक्षिका व नागरीकांची उपस्थिति होती. सूत्र संचालन मिनल वासेकर यांनी मानले. आभार प्रदर्शन शिक्षिका करिश्मा तांदुळकर यांनी केले. हे कार्यक्रम बोधिसत्व मैत्री संस्था यांचे अध्यक्ष आयु, श्याम कुमरवार याच्या संकल्पनेने साकार करण्यात आले.