मोदी, राज ठाकरेंवर कन्हैया कुमारांची विखारी टीका : म्हणाले, एक अकेल्याची हालत खस्ता
चंद्रपूर : चंद्रपूर-वणी -आर्णी लोकसभा मतदार संघातील महाआघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ कन्हैया कुमार यांची आज ( रविवार ) चंद्रपुरात सभा या सभेत कन्हैया कुमारांनी महायुतीवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित पवार, राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ‘एक अकेला’ म्हणणारे मोदी यांची महाराष्ट्रात काय अवस्था झाली आहे ? बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. एकनाथ शिंदेना पुढे केले. शिंदे आल्याने काम बनलं नाही म्हणून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्ष फोडला. अजित पवारांना भाजपात घेतलं. त्यांनंतर काँग्रेसच्या त्या नेत्यांना भाजपात घेतलं ज्यांचा पराभव झाला होता. मिलिंद देवरा, अशोक चव्हाण यांचं उदाहरणं ताज आहे. एवढे दिग्गज नेते आल्यावर ही भाजपाचे समाधान झालं नाही. बिना पाणी पिता मोदी, अमित शहा यांच्यावर टीका करणारे राज ठाकरे यांना ही भाजपाने स्वतःकडे ओढलं. ‘एक अकेला’ म्हणणारे मोदी यांनी मोठी वरात गोळा केली आहे. या वरातीत असलेल्या वऱ्हाडयांना कधी भ्रष्टाचारी म्हणून आग ओकली जात होती. परिवार वादी म्हणून हिणवलं जात होतं. अजित पवार काँग्रेस सोबत असताना परिवार वादी होते. भाजपात जातात त्यांचावरील परिवारवादाच्या सिक्का पुसला गेला, असे चिमटे कन्हैया कुमार यांनी काढले. न्यू इंग्लिश हायस्कूल ग्राउंडवर कन्हैया कुमार यांची आज सभा झाली. या सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. भाजपावर आरोप करताना महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आव्हान कन्हैया कुमार यांनी केले. यावेळी मंचावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे, रितेश तिवारी शहर अध्यक्ष चंद्रपूर शहर कॉंग्रेस कमेटी, घनश्याम मुलचंदानी काँग्रेस नेते, के.के. सिंह, सुभाष गौर, रमेश दहीवडे, दिनेश चोखारे, डॉ. अभिलाषा गावतुरे, विजय नळे, दिलीप चौधरी(संभाजी ब्रिगेड), समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख मंचावर उपस्थित होते. तसेच इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी( शरदचंद्र पवार गट), द्रमूक, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धानोरकरांची मुनगंटीवार यांच्यावर टीका…
इमारती उभ्या केल्यात, बगीचे केलेत, बांधल्या बांधल्या छत कोसळणारे बस स्थानकही केलेत. यांच्या सामान्य माणसांना काय उपयोग? बापाचा खांद्याला खांदा लावून दोन दोन मुलं खाणारे आहेत. या मुलांचा हातांना रोजगार नाही. इमारती बाग बगीचे उभे केल्याने पोटाची भूक भागत नाही. भूक भागविण्यासाठी अन्नाचा दाना लागतोय. त्यासाठी रोजगार हवाय. या गंभीर विषयावर तुम्ही काय केलंत? असा सवाल महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केला.
मोदींच्या जाहिरातबाजीवर कन्हैया भडकले..
फेरनलव्हली लावल्याने चेहरा गोरा होतोय काय? फेरनलव्हली लावल्याने चेहरा गोरा झालेला एक माणूस दाखवा. काळा असो की गोरा, त्याने काय फरक पडणार. आपल्या देशात ईश्वराचा रंग काळा आहे. तिथे जोर जबरदस्तीने गोरं होण्यात काय फायदा? आकर्षक जाहिरातीच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्या मनावर बिंबवील जातात. वास्तविक तेपासून दूर ठेवण्यासाठी असा प्रचार केला जातो. टीव्ही सुरु केलं तर मोदी दिसतील. पेट्रोल पंपावर मोदी मोबाईल उघडताच, रेडिओ सुरु करताच मोदी, वर्तमानपत्रात मोदी दिसतील. मोदी माणूस आहेत की ईश्वर. आता भाजपाचे काही नेते म्हणू लागलेत मोदीजी ईश्वर आहेत. कशासाठी चाललंय हे सारं. दहावर्षाचा काळात असा कोणता विकास केलात की आता 2024 मध्ये तुम्हाला पुन्हा निवडून द्यायचं. असे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. या प्रश्नांना बगल दिल्या जात आहे अब की बार,चारसो पार च्या नाऱ्यात महत्त्वाचे प्रश्न झाकोळला जात आहेत, असा आरोप कन्हैया कुमार यांनी केला.